शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अधिकार व कायद्याची माहिती असावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 1:10 AM

प्रत्येक नागरिक व विद्यार्थ्याला आपल्याला राज्य घटनेने दिलेले अधिकार प्राप्त तसेच कायद्याची माहिती असावी, कायद्याची जनजागृती करण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे, जनजागृतीनेच समाजात गुन्ह्याचे प्रमाण कमी होईल व अन्याय, अत्याचार तसेच विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांमध्ये कायद्याची भीती निर्माण होईल,.....

ठळक मुद्देप्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीशाचे प्रतिपादन : कायदेविषयक शिबिरात मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रत्येक नागरिक व विद्यार्थ्याला आपल्याला राज्य घटनेने दिलेले अधिकार प्राप्त तसेच कायद्याची माहिती असावी, कायद्याची जनजागृती करण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे, जनजागृतीनेच समाजात गुन्ह्याचे प्रमाण कमी होईल व अन्याय, अत्याचार तसेच विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांमध्ये कायद्याची भीती निर्माण होईल, असे प्रतिपादन गडचिरोली प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी.मेहरे यांनी केले.जिल्हा विधीसेवा प्राधिकरण व राष्ट्रीय सेवा योजना तसेच सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक शिवाजी महाविद्यालयात बुधवारी कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर न्यायाधीश बी.एम.पाटील, विधी स्वयंसेवक वर्षा मनवर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.जी.कांबळे, प्राचार्य डॉ.बी.एस.चिकटे आदी उपस्थित होते. यावेळी कांबळे यांनी मुलांची काळजी व संरक्षण कायदा, नवीन मनोधैर्य योजना, पिडीतांसाठीची नुकसानभरपाई योजना, ग्राहक संरक्षण कायदा आदीबाबतची माहिती दिली.मुली व स्त्रीयांवर होणारे अत्याचार व त्याविरोधात करावयाची तक्रार, बचावात्मक कायदे याबाबतची माहिती वर्षा मनवर यांनी दिली. प्राचार्य डॉ.चिकटे यांनी कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे अध्यक्षीय भाषणातून सांगितले. संचालन जोत्सना सिडाम तर आभार प्रा.ढोमणे यांनी मानले.