लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सध्या हलक्या प्रतिचे तूर पीक बहरावर आहे. काही दिवसांतच तूर पिकावर शेंगा येणार आहेत. अशास्थितीत पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची पाहणी करून वेळीच नियंत्रणासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपाय करावेत, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.यंदाचा खरीप हंगाम जुलै महिन्यापासून सुरू झाला. पावसाळ्याच्या सुरूवातीलाच शेतकºयांनी धानासह तुरीचीसुद्धा पेरणी केली. त्यामुळे सध्या हलके तूर पीक बहरावर आहे. काही दिवसांतच मध्यम प्रतिच्या तूर पिकाला बहर येईल. या कालावधीत शेंगा पोखरणाऱ्या (हेलीकोवर्पा) या किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगांवर अंडी घालतात. अंड्यातून निघालेल्या अळ्या तुरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पिसारी पतंगाची अळी १२.५ मिमी लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सूक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरडून छीद्र करते व बाहेर राहून दाणे पेखरते. शेंगेमाशीची अळी बारीक गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. ही अळी शेंगातील दाणे अर्धवट कुरतडून खाते. परिणामी दाण्याची मुकणी होते. शेंगा पोखरणाऱ्या अळीमुळे निम्म्यापेक्षा कमी तूर वाया जात असल्याने उत्पादन कमी प्रमाणात होते.तूर पिकाचे एकात्मिक व्यवस्थापनतूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगे माशी आदी प्रकारच्या अळींचा प्रादुर्भाव होत आहे. तिन्ही अळ्या फुले व शेंगावर आक्रमण करीत असतात. त्यामुळे उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करावी, यामुळे किडीचे कोष नष्ट होतात. कीड प्रतिबंधक वाणांचा वापर करावा, तुरीसह ज्वारी, बाजरी व मका ही आंतरपिके घ्यावी, प्रति हेक्टर २० पक्षीथांबे शेतात उभारावे. तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे, त्यानंतर पोत्यावर पडलेल्या अळ्या नष्ट कराव्या. शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांसाठी वेळीच नियंत्रणाचे उपाय न केल्यास नुकसान होऊ शकते.अशी करावी फवारणीकळी अवस्थेत पहिली फवारणी निम कीटकनाशकाची (अॅझााडिरेक्टीन ३०० पीपीएम, ५० मिली/१० लिटर पाणी) करावी. पहिल्या फवारणीस विलंब झाल्यास बारीक अळ्या दिसून लागतात. निम कीटकनाशकाच्या ऐवजी रासायनिक कीटकनाशक (क्लिनालफॉस २० टक्के प्रवाही २० मिली १० पाण्यात फवारावे.
शेंगा पोखरणाऱ्या अळींचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 11:51 PM
सध्या हलक्या प्रतिचे तूर पीक बहरावर आहे. काही दिवसांतच तूर पिकावर शेंगा येणार आहेत. अशास्थितीत पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देकृषी तज्ज्ञांचा सल्ला : तुरीवरील अळ्यांचे योग्य व्यवस्थापन करा