लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी मो. : कुनघाडा रै. वन परिक्षेत्रातील माल्लेरमाल नजीकच्या करडोह येथील नदीतून अवैधरित्या खुलेआम रेती तस्करी सुरू असून येथील रेती कुनघाडा रै. गावात पोहोचविली जात आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे वन विभागासह महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.शासनाकडून कुनघाडा रै. येथे काही शासकीय इमारत बांधकामासाठी रेतीचा पुरवठा केला जात आहे. सदर रेती तस्कर हा परिसरातील असून या अवैध रेती तस्करीची माहिती अधिकाऱ्यांना कशी काय मिळाली नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. रेतीची चोरी होत असल्याने शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. यापूर्वी रेतीतस्करी नेहमीच्या घाटावरून होत होती.वन विभागाकडे एकदा तक्रार केल्यानंतर ट्रॅक्टर वाहतुकीचा रस्ता बंद करण्यात आला. त्यानंतर या ठिकाणापासून अर्धा किमी अंतरावरून नदीची दरड फोडून तस्करांनी रस्ता बनविला. अहोरात्र ट्रॅक्टरने रेतीची तस्करी केली जात आहे. नदी घाटावर रहदारीसाठी रोजगार हमी योजनेंतर्गत रस्ता बनविण्यात आला. मात्र ट्रॅक्टरने अवैधरित्या होत असलेल्या रेतीच्या वाहतुकीने हा रस्ता पूर्णत: खराब झाला. गावातील मंदिरापासून ते मुख्य रस्त्यावर रात्रंदिवस खुलेआम रेतीची वाहतूक व तस्करी सुरू आहे. वन व महसूल विभागाने नदी पात्रात पडलेल्या खड्ड्याचे मोजमाप करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.विशेष म्हणजे, लोकमत प्रतिनिधीने रेती घाट परिसरात भेट दिली असता, फावडे, घमले व इतर साहित्य घेऊन ट्रॅक्टर परत येण्याची प्रतीक्षा नदी पात्रावर हमाल करीत असल्याचू दिसून आले.माझी या क्षेत्रात बदली होऊन दीड महिना झाला आहे. या क्षेत्राचा प्रभार सांभाळणाºया तलाठ्याने यापूर्वीच सदर माहिती मला कळवायला हवी होती. सदर प्रकरणाची चौकशी सुरू करणार असून दोषींवर कारवाई केली जाईल. या क्षेत्राची अजूनपर्यंत पूर्ण माहिती आपणाला झाली नाही. त्यामुळे तलाठ्याने माहिती देणे आवश्यक आहे.- विलास मुप्पीडवार, मंडळ अधिकारी, कुनघाडा रै. सर्कलयापूर्वी सुध्दा रेती तस्करी सुरू होती. आपल्या तक्रारीनंतर सदर घाट बंद करण्यात आला. त्यानंतर तस्करांनी दुसरीकडून नदी पात्राची दरड फोडून रस्ता बनविला. येथून रेती तस्करी सुरू आहे. संबंधित विभागाने रेती खोदकामाची मोजणी करावी. गावात चौकशी करून दरड फोडून रस्ता तयार करणाºयाची माहिती मिळवून संबंधितांवर कारवाई करावी. आपण याबाबतची रितसर तक्रार तहसीलदारांकडे करणार आहोत.- नरेंद्र मोहुर्ले, सरपंच, माल्लेरमाल
नदीपात्रातून सर्रास होते रेती तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:49 AM
कुनघाडा रै. वन परिक्षेत्रातील माल्लेरमाल नजीकच्या करडोह येथील नदीतून अवैधरित्या खुलेआम रेती तस्करी सुरू असून येथील रेती कुनघाडा रै. गावात पोहोचविली जात आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे वन विभागासह महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
ठळक मुद्देवाहतुकीने रस्त्याची दुर्दशा : कुनघाडा रै.नजीकच्या माल्लेरमाल भागातील प्रकार