सिमेंट काॅंक्रीटच्या नालीचे बांधकाम संबंधित कंत्राटदाराने अंदाजपत्रकानुसार केले नाही. नालीच्या कडा याेग्यरीत्या भरल्या नाही. त्यानंतर रस्त्यासाठी खाेदकाम केले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. या मार्गावरील गटर लाईनचे चेंबर दिसत आहेत. डांबरीकरणाचे काम करताना संबंधित कंत्राटदाराने खाेदकाम करणे गरजेचे हाेते. मात्र, तसे न केल्याने चेंबरचे झाकण खाली व रस्ता वर येईल, रस्त्याची उंची अधिक राहून चेंबरच्या ठिकाणी खड्डे निर्माण हाेतील. गटर लाईनचे चेंबर व रस्ता यात समांतर असणे गरजेचे आहे, अन्यथा आवागमन करणाऱ्या वाहनधारकांना त्रास हाेणार आहे. चार इंच खाेल खाेदकाम करून त्यात ४० किंवा ८० एमएमची गिट्टी टाकणे आवश्यक आहे. मात्र, खाेदकाम न करता थेट गिट्टी टाकून या रस्त्याचे काम आटाेपून घेण्याच्या तयारीत संबंधित कंत्राटदार आहे, असे वानखेडे यांनी म्हटले आहे.
बाॅक्स ......
..तर महिलांना घेऊन पालिकेवर धडकणार
माझ्या घरासमाेरील रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार दर्जेदार व्हावे, अशी आमची मागणी आहे. मात्र, नगर परिषद प्रशासनातील अधिकारी व प्रशासकीय यंत्रणा तसेच कंत्राटदाराच्या उदासीनतेमुळे या रस्त्याचे काम याेग्यरीत्या हाेत नसल्याचे दिसून येते. येत्या दाेन-तीन दिवसांत पालिकेच्या पर्यवेक्षीय यंत्रणेने प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी येऊन पाहणी करावी, कामात सुधारणा करण्यात यावी, अन्यथा वाॅर्डातील महिलांना व काॅंग्रेस कार्यकर्त्यांना घेऊन नगर परिषद कार्यालयावर धडक देणार, असा इशारा भावना वानखेडे यांनी दिला आहे.