लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : परिसरातील शंकरनगरातील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याकरिता २० दिवसांपूर्वी रस्त्यावर मोठी बोल्डर गिट्टी पसरविण्यात आली. परंतु अद्यापही या रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले नाही. परिणामी गावातीलही नागरिकांना आवागमनास अडचण येत आहे. तसेच पाळीव जनावरांना दुखापत होत आहे. सदर रस्त्याचे बांधकाम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.शंकरनगर ग्रामपंचायत अंतर्गत गावातील अंतर्गत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जाणार आहे. महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजनेतून रवीन सरकार, कार्तिक दास व जिजुरा गोस्वामी ते विश्वनाथ माजी यांच्या घरापर्यंत दोन सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम होणार आहे. सदर रस्त्याचे बांधकाम करण्याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने खोदकाम करून रस्त्यावर मोठे ८० एमएमचे बोल्डर पसरविले. गेल्या २० दिवसांपासून मोठी गिट्टी पसरविली असतानाही अद्यापही कामाला सुरूवात झाले नाही. रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत ग्रामपंचायत मार्फत चालढकल केली जात आहे. तसेच ग्रामपंचायत सचिव, पदाधिकारी यांच्याकडून रस्त्याच्या बांधकामासंदर्भात विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे सदर कामाला अद्यापही प्रशासकीय मान्यता मिळाली नसावी, असे गावातील नागरिकांमध्ये बोलले जात आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्याच्या बांधकामासंदर्भात काय प्रक्रिया केली ही बाब ग्रा.पं.लाच माहित. परंतु रस्त्यावर टाकलेल्या बोल्डरमुळे नागरिकांना आवागमन करताना अडचणी येत आहेत. नागरिकांना त्रास होत असल्याने सदर रस्त्याचे बांधकाम सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
रस्ता बांधकामात दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 1:09 AM
परिसरातील शंकरनगरातील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याकरिता २० दिवसांपूर्वी रस्त्यावर मोठी बोल्डर गिट्टी पसरविण्यात आली. परंतु अद्यापही या रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले नाही. परिणामी गावातीलही नागरिकांना आवागमनास अडचण येत आहे.
ठळक मुद्देशंकरनगरातील प्रकार : २० दिवसांपूर्वी रस्त्यावर पसरविले बोल्डर