वैरागड : आरमाेरी तालुक्यातील सुकाळा आणि कुरखेडा तालुक्यातील साेनेरांगी या दाेन गावांदरम्यान जाेडणाऱ्या पाणंद रस्त्यावर बांधलेला सीडीवर्क म्हणजे पूल कायम आहे. मात्र, पाण्याच्या प्रवाहाने या पुलालगतचा संपूर्ण रस्ता गायब झाला. परिणामी या रस्त्याने आवागमन करणे कठीण झाले आहे. सन २०१८-१९ या वर्षात साेनेरांगी, सुकाळा या पाणंद रस्त्यावर सुकाळा गावापासून थाेड्या अंतरावर गाव तालावाच्या अंतर्गत भागात सीडीवर्कचे बांधकाम करण्यात आले. पण, या ठिकाणी बांधलेला पूल अंदाजपत्रापेक्षा लहान बांधण्यात आला. या कामात आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला, असा आराेप या भागातील नागरिकांनी केला आहे. बांधलेला पूल लहान आहे. जंगलातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने सीडीवर्कजवळचा संपूर्ण रस्ता तुटला आहे.
साेनेरांगी-सुकाळा पाणंद रस्त्याची दुरवस्था झाल्याने या मार्गाने आवागमन करणाऱ्या नागरिकांची फजिती हाेत आहे. सीडीवर्कनजीक तुटफूट झालेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सुकाळा व साेनेरांगी येथील नागरिकांनी केली आहे. प्रशासनाच्या नियाेजनशून्यतेमुळे रस्त्याची अशी दैनावस्था झाल्याचे नागरिकांमध्ये बाेलले जात आहे.
बाॅक्स...
अनेक रस्त्यांची चाळण
आरमाेरी तालुक्यातील वैरागड हे मध्यवर्ती केंद्र असून, वैरागडशी दरराेजचा संबंध येणाऱ्या १५ ते २० गावांतील नागरिक आवागमन करतात. वैरागडपासून वनखी, वासाळा, चामाेर्शी, तसेच इतर भागात जाता येते. मात्र, परिसरातील अनेक गावाला जाेडणाऱ्या रस्त्यांची चाळण झाली आहे. मागणी करूनही प्रशासन व लाेकप्रतिनिधींचे दुर्लक्ष हाेत आहे.