शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

चिचडोह बॅरेजच्या वाहनांनी लावली मार्कंडादेव रस्त्याची वाट

By admin | Published: August 09, 2015 1:29 AM

चामोर्शी तालुक्यात मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेज प्रकल्पाच्या कामावरील शेकडो वाहनांच्या आवागमनामुळे ...

बांधकाम विभाग सुस्त : दुरूस्तीच्या मागणी निवेदनाकडेही दुर्लक्षचगडचिरोली : चामोर्शी तालुक्यात मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेज प्रकल्पाच्या कामावरील शेकडो वाहनांच्या आवागमनामुळे चामोर्शी ते मार्र्कंडा या रस्त्याची संपूर्ण वाट लागली आहे. या रस्त्याला जड वाहनांमुळे जागोजागी खड्डे पडले आहे. या रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी वाहने चालविणे कठीण झाले आहे. विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडा तिर्थ क्षेत्रावर वर्षभर शेकडो भाविक विदर्भाच्या तसेच राज्याच्या विविध भागातून येत असतात. त्यांची वाहनेही येथून येते. मागील दोन वर्षांपासून चिचडोह बॅरेज प्रकल्पाच्या कामावरील शेकडो वाहने या रस्त्यावरून माल वाहतूक करीत आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता उखडून गेला आहे. येथून वाहन चालविणेही कठीण झाले आहे. मार्र्कंडा देवस्थान ट्रस्टने या बाबत जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच तालुका प्रशासनालाही रस्ता दुरूस्ती करण्याबाबत वेळोवेळी निवेदन दिले. परंतु कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेने रस्ता दुरूस्तीच्या कामाबाबत अद्याप दखल घेतलेली नाही. या संपूर्ण रस्त्याच्या दूरावस्थेबाबत चिचडोह बॅरेजच्या कंत्राटदाराकडून दंडात्मक वसुली करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. दरवर्षी महाशिवरात्रीपूर्वी बांधकाम विभाग या रस्त्याची दुरूस्ती करते. परंतु या रस्त्यावर कंत्राटदारांच्या वाहनांची प्रचंड वाहतूक असल्याने दुरूस्त केलेला रस्ताही आता खड्ड्यात रूपांतरित झाला आहे. रस्त्यावर अनेकदा प्रकल्पाच्या कामाची वाहने चिखलात फसल्याच्याही घटना घडल्या आहे. (जिल्हा प्रतिनिधी)