अरूण राजगिरे।लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव/चोप : आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत अनुक्रमे आदिवासी विविध कार्यकारी संस्था व खरेदी-विक्री सहकारी संस्थांच्या वतीने जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्रांवर धानाची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र देसाईगंज तालुक्यातील केंद्रांवर हातकाट्याचाच वापर केला जात असल्याने काट्याच्या वजनात शेतकऱ्यांची लूट होत आहे.आधारभूत धान खरेदी केंद्रावर इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याच्या सहाय्याने धानाची खरेदी करणे शासनाचे बंधनकारक केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देसाईगंज तालुक्यात खरेदी विक्री सहकारी संस्थांच्या व आविकां संस्थांच्या केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक वजनकाटेही पुरविण्यात आले आहेत. मात्र या इलेक्ट्रॉनिक काट्यांना धूळखात ठेवून व नियमाला बगल देऊन पारंपरिक व साध्या हातकाट्याने धानाची मोजणी केली जात आहे.हातकाट्यामुळे प्रत्येक ४० किलोच्या पोत्याच्या वजनात दीड ते दोन किलो धान अधिकचे जात आहे. यात शेतकºयांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीकडे विचारणा केली असता, देसाईगंज येथील कृषी बाजार समितीच्या यार्डमध्ये व देसाईगंज तालुक्यात मार्केटिंग फेडरेशन व आविका संस्थेच्या केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक काटे पुरविण्यात आल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली आहे. देसाईगंज तालुक्यात मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने देसाईगंज व यावर्षी नव्यानेच कोरेगाव येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. पिंपळगाव येथे आविका संस्थेचे आधारभूत केंद्र आहे. वडसा, कोरेगाव व पिंपळगाव या तीनही केंद्रावर नियमाला बगल देऊन धानाचा हातकाटा केला जात आहे.शेतकऱ्यांची अशा पद्धतीने सर्रास लूट सुरू असताना अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष आहे. प्रत्येक केंद्रावर ब्रिटीशकालीन कालबाह्य झालेल्या वजन काट्याऐवजी कृषी उत्पन्न बाजार समितीने धान खरेदी परवानाधारकांना इलेक्ट्रॉनिक काटे पुरविले.कृषी उत्पन्न बाजार समितच्या वडसा येथील यार्डमध्ये व्यापारी इलेक्ट्रॉनिक काट्याचा वापर करीत आहेत पण ग्रामीण भागातील हमीभाव खरेदी केंद्रांवर मात्र सर्रास लूट सुरू आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांची धान विक्रीत होणारी ही लूट थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सर्व धान खरेदी व्यावसायिक व हमीभाव केंद्रांना इलेक्ट्रॉनिक काटे पुरविले आहेत, जर साध्या हातकाट्याने धानाची खरेदी होत असेल तर ही शेतकऱ्यांची लूट आहे.- खिरसागर नाकाडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, आरमोरी
धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 5:00 AM
हातकाट्यामुळे प्रत्येक ४० किलोच्या पोत्याच्या वजनात दीड ते दोन किलो धान अधिकचे जात आहे. यात शेतकºयांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीकडे विचारणा केली असता, देसाईगंज येथील कृषी बाजार समितीच्या यार्डमध्ये व देसाईगंज तालुक्यात मार्केटिंग फेडरेशन व आविका संस्थेच्या केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक काटे पुरविण्यात आल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली आहे.
ठळक मुद्देहातकाट्याचा वापर : इलेक्ट्रॉनिक्स काटे धूळखात