शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
6
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
7
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
8
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
10
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
11
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
12
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
13
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
14
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
15
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
16
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
17
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
18
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
19
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
20
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन

नक्षल्यांकडून रोडरोलरची जाळपोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:58 AM

नक्षल्यांनी २५ मे रोजी महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यात बंदचे आवाहन केले होते. कोरची शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. भामरागड तालुक्यातील कुमरगुडा गावात रोडरोलरला नक्षलवाद्यांनी आग लावली.

ठळक मुद्देकोरचीत बंद : सप्ताहाचा शेवटचा दिवस; दुर्गम भागातील नागरिकांमध्ये भीती

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची/भामरागड : नक्षल्यांनी २५ मे रोजी महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यात बंदचे आवाहन केले होते. कोरची शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. भामरागड तालुक्यातील कुमरगुडा गावात रोडरोलरला नक्षलवाद्यांनी आग लावली.पोलीस व नक्षलवादी यांच्यादरम्यान झालेल्या चकमकीत सुमारे ४० नक्षलवादी ठार झाले होते. या नक्षलवाद्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी नक्षल सप्ताहाचे आयोजन केले होते. २५ मे हा नक्षल सप्ताहाचा शेवटचा दिवस होता. या दिवशी बंद पाळण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी केले होते. जिल्ह्यातील इतर कोणत्याही भागात नक्षल बंदला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र कोरची येथे संपूर्ण दिवसभर बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. बस व खासगी वाहतूक सुध्दा ठप्प होती. कोरची तालुक्यातील दुर्गम भागातही बंद पाळण्यात आला. कोरची शहरात काही ठिकाणी दुकानांसमोर नक्षल्यांनी बॅनर बांधले होते.भामरागड तालुकास्थळापासून पाच किमी अंतरावरील आलापल्ली मार्गावर असलेल्या कुमरगुडा येथील पोच मार्गाच्या खडीकरणाचे काम सुरू होते. दिवसभर काम केल्यानंतर रात्रीदरम्यान सर्व वाहने गावातून नेली जात होती. मात्र रोडरोलर हा गावातच ठेवण्यात येत होता. २४ मे च्या रात्री नक्षल्यांनी या रोडरोलरला आग लावली. यामध्ये रोडरोलरचे नुकसान झाले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी