शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबईत भाजपाला धक्का! तिकीट नाकारताच संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निलेश राणेंचं ठरलं! धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढणार
3
निवडणुकीपूर्वी अजित पवारांना 'सुप्रीम' दिलासा; घड्याळ चिन्हाबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय! 
4
सोन्याची किंमत नव्या शिखरावर, चांदीही लाखाच्या पार; खरेदीपूर्वी पाहा १८ ते२४ कॅरेट सोन्याचे दर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : " सापडलेल्या पाच कोटी प्रकरणी संजय राऊतांची चौकशी व्हावी,", अजितदादांच्या नेत्याने केली मागणी
6
इनोव्हामध्ये ५ कोटींची रोकड सापडली, पण कारमालकाने केला वेगळाच दावा; जबाबदारी झटकत म्हणाला...
7
आचारसंहितेचं उल्लंघन होतंय; मग करा 'सी-व्हिजिल एप'वर तक्रार!
8
ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, इमारत कोसळली, ९ कर्मचारी गंभीर जखमी 
9
"मी यापुढे कधाही.."; प्रभासला 'जोकर' म्हणाल्यानंतर ट्रोल झालेल्या अर्शद वारसीचं मोठं विधान, म्हणाला-
10
महागाईचा सामना करण्यासाठी सरकारला अंबानींची साथ; Reliance Retailमध्ये मिळणार स्वस्त डाळ, तांदूळ?
11
जळगावमधील उद्धव सेनेचे इच्छुक मुंबईत ठाण मांडून, मविआच्या जागांचा फैसला होईना...
12
...म्हणून पृथ्वी शॉला मुंबईच्या संघातून काढलं; कारण वाचून तुम्हीही डोक्याला लावाल हात
13
माझ्या बापाविषयी बोलाल तर खबरदार, तुमचे काय वाईट केले: जयश्री थोरात यांचा पलटवार
14
मॉडेलिंगचं स्वप्न, १५ वर्षे मोठ्या अधिकाऱ्यासोबत लग्न, घटस्फोटानंतरही राहत होते एकत्र, आता सापडला तरुणीचा मृतदेह  
15
नाशिकमध्ये कुठे नाराजी, कुठे धुसफूस; तर कुठे बंडखोरीची दिसताहेत चिन्हे!
16
"बबिता फोगटला ब्रिजभूषण सिंहांची जागा घ्यायची होती, म्हणून...", साक्षी मलिकचा मोठा दावा
17
१५९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच HSBC मध्ये महिला CFO ची नियुक्ती; पाहा कोण आहेत पाम कौर?
18
७ ऑक्टोबरच्या हल्ल्यातून वाचलेल्या तरुणीने वाढदिवशी उचललं टोकाचं पाऊल, कुटुंबीय म्हणतात...
19
"शब्द दिला असताना तिकीट नाकारलं"; संदीप नाईकांचा भाजपला रामराम, तुतारी हाती घेण्याची शक्यता
20
सर्फराज खानच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; भारतीय खेळाडू आता 'बापमाणूस'!

रोहयो कामावर मिळाली केवळ ६० रूपये मजुरी

By admin | Published: June 16, 2016 2:00 AM

कुरखेडा-कुंभीटोला येथील पांदण रस्त्याच्या कामावरील मजुरांना दिवसभर काम करून केवळ ५० ते ६० रूपये मजुरी मिळत आहे.

तहसीलवर मजुरांची धडक : कुरखेडा-कुंभीटोला पांदण रस्त्याचे कामकुरखेडा : कुरखेडा-कुंभीटोला येथील पांदण रस्त्याच्या कामावरील मजुरांना दिवसभर काम करून केवळ ५० ते ६० रूपये मजुरी मिळत आहे. अत्यल्प मजुरीमुळे संतप्त झालेल्या शेकडो मजुरांनी बुधवारी जि. प. सदस्य निरांजनी चंदेल व राकेश चव्हाण यांच्या नेतृत्वात पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली. यावेळी रोजगार सेवक व अभियंत्यांला घेराव घालून यासंदर्भात जाब विचारण्यात आला. मात्र त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने मजुरांनी तहसीलदारांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. तहसीलदारांनी दोन दिवसांत बांधकाम स्थळावर येऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याने ठिय्या आंदोलन मजुरांनी मागे घेतले. ग्रामपंचायत कुंभीटोला अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मागील दोन आठवड्यांपासून पांदण रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. सदर कामावरील मजुरांना फक्त ५० ते ६० रूपयेच मजुरी पडत आहे. वास्तविक शासकीय धोरणानुसार दिवसभर काम करणाऱ्या मजुराला किमान १९२ रूपये मजुरी मिळणे अपेक्षित आहे. मात्र या कामावर अत्यल्प मजुरी मिळत असल्याने बुधवारी संतप्त मजुरांनी पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली. रोजगार सेवक व अभियंता ढवळे यांना घेराव घातला. यावेळी त्यांनी खोदकामाच्या मोजमापाप्रमाणे मजुरांची मजुरी काढलेली आहे. बांधकाम स्थळाची माती अत्यंत कठीण असल्याने अपेक्षित मजुरी पडत नसल्याचे त्यांनी सांगितले व कायद्याचे बंधन असल्याने मोजमापात किंवा दरात फेरफार करण्याचा अधिकार आम्हाला नाही, असे स्पष्ट केले. या उत्तराने समाधान न झालेल्या मजुरांनी स्थानिक तहसील कार्यालयात तहसीलदार यू. एम. तोडसाम यांची भेट घेऊन आपली अडचण त्याना समजावून सांगितली. त्यांनी दोन दिवसांत मोका चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी मजुरांच्या प्रतिनिधी म्हणून सिंधू इस्कापे उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)