आरमोरीत परिसंवाद : जिल्हा माहिती अधिकाऱ्यांचे प्रतिपादनआरमोरी : जनतेला जागृत करणे, त्यांची निर्णयक्षमता वाढविणे यात पत्रकारिता व प्रसारमाध्यमांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम प्रसारमाध्यम असून यामुळे शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचतो. समाजाच्या विकासात प्रसार माध्यमांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी केले. स्थानिक महात्मा गांधी महाविद्यालय गुरूवारी आयोजित ‘प्रसार माध्यमे : जबाबदारी, वास्तव, सेवा आणि संधी’ या विषयावरील परिसंवादात दैठणकर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा होते. प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार रोहिदास राऊत, प्रा. डॉ. विशाखा वंजारी, प्रा. नामेश मेश्राम, प्रा. डॉ. विजय रैवतकर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा म्हणाले, माहितीच्या युगात प्रसार माध्यमांविषयी विद्यार्थ्यांनी उदासीनता न बाळगता त्यातील विविध संधीचा लाभ घ्यावा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिलीप घोनमोडे, संचालन डॉ. विजय रैवतकर तर आभार नामेश मेश्राम यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. स्नेहा मोहुर्ले, प्रा. खगेश सहारे, प्रा. प्रमोद म्हशाखेत्री, प्रशांत दडमल, धीरज निमगडे, किशोर कुथे, सचिन काळबांधे व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
समाज विकासात माध्यमांची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2016 2:15 AM