लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २४ ग्रामपंचायतींच्या एकूण मतदान केंद्रांपैकी निम्म्याहून अधिक मतदान केंद्र संवेदनशील व अतिसंवदेनशील असतानाही नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. जिल्हाभरात जवळपास सरासरी ८० टक्के मतदान झाले आहे.एकूण २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी कोरची तालुक्यातील बोगाटोला, धानोरा तालुक्यातील नवरगाव, ग्रामपंचायतीत अविरोध निवड झाली. त्यामुळे या दोन ठिकाणी मतदान झाले नाही. उर्वरित २४ ग्रामपंचायतीमध्ये सोमवारी मतदान घेण्यात आले. एकूण मतदान केंद्रांपैकी २६ मतदान केंद्र अतिसंवेदनशील व २३ मतदान केंद्र संवेदनशील होते. तर २८ मतदान केंद्र सर्वसाधारण आहेत. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. एवढेच नव्हे तर पोलीस बंदोबस्तात पोलिंग पार्ट्यांची ने-आण करण्यात आली. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना मतदान करण्यासाठी सातत्याने आवाहन केल्याने मतदानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत होता. काही गावांमध्ये सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत नागरिकांच्या रांगा लागल्या असल्याचे दिसून येत होते.नक्षलग्रस्त भाग असल्याने दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदान ठेवण्यात आले. सायंकाळपर्यंत पोलिंग पार्ट्या तहसील कार्यालयात पोहोचल्या. सर्व ग्रामपंचायतीचा निकाल मंगळवारी घोषित केला जाणार आहे. सरपंचपदाची पहिल्यांदाच थेट जनतेतून निवड होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे मतदान मोजणी केंद्रावर प्रचंड प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे.अन् प्रशासकीय यंत्रणा झाली ‘स्विच्ड आॅफ’ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान आटोपले. नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील केंद्रांवरील कर्मचारी सुरक्षितपणे आपल्या मुख्यालयी पोहोचेपर्यंत आणि मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करेपर्यंत प्रशासकीय यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे होते. परंतु या निवडणुकीची जबाबदारी असणारे निवासी उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभागाचे नायब यांचे मोबाईल सायंकाळपासून बंद होते. रात्री ९ वाजता जिल्हाधिकारी नायक सुटीवर असल्याने मतदानाची टक्केवारी त्यांनाही माहीत नव्हती.
मतदानासाठी लागल्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 10:27 PM
२४ ग्रामपंचायतींच्या एकूण मतदान केंद्रांपैकी निम्म्याहून अधिक मतदान केंद्र संवेदनशील व अतिसंवदेनशील असतानाही नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
ठळक मुद्दे८० टक्के मतदान : चोख सुरक्षा व्यवस्थेमुळे निवडणूक शांततेत आटोपली