लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : स्थानिक स्तरावर हाेणाऱ्या कृषी व इतर उत्पादनांवर प्रक्रिया उद्याेग स्थापन करणाऱ्याला अर्थसाहाय्य देण्यासाठी केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारतअंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्याेग ही याेजना सुरू केली आहे. या याेजनेंतर्गत जिल्ह्याला १४० उद्याेग निर्मितीचे टार्गेट देण्यात आले आहे. गडचिराेली जिल्ह्यात ७८ टक्के क्षेत्रावर जंगल आहे. वनाेपजाची उलाढाल सुमारे एक हजार काेटींच्या घरात आहे. माेहफुल, बेहडा, डिंक, चाराेळी, टाेळी अशा प्रकारच्या काेणत्याही वनाेपजावर प्रक्रिया करणारे उद्याेग स्थापन करण्यासाठी जिल्ह्यात चांगला वाव असल्याने या याेजनेंतर्गत अशा प्रकारचे उद्याेग निर्मितीसाठी अनुदान दिले जाणार आहे. कमीत कमी ३५ टक्के व जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे.
काेणाला घेता येणार लाभ वैयक्तिक, संस्था, बचत गट यांना या याेजनेचा लाभ घेता येणार आहे. अर्ज ऑनलाईन करता येणार आहे. अर्ज कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाने जिल्हाभरात ९ डिस्ट्रीक्ट रिसाेर्स पर्सन नेमले आहेत. कृषी विभागाचे कर्मचारीही याबाबतची प्राथमिक माहिती देऊ शकतील.
असे मिळणार अनुदान यामध्ये प्रकल्पाच्या एकूण किमतीच्या १० टक्के लाभार्थी हिस्सा, ५५ टक्के बँक कर्ज, ३५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. १० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्याचे अधिकार जिल्हास्तरावर आहेत. एखादा माेठा प्राेजेक्ट असल्यास त्याला दाेन काेटी रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाची परवानगी लागेल. आतापर्यंत जिल्ह्यातील ४२ जणांनी अर्ज केले आहेत. २ अर्ज बँकेकडे कर्ज मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.
प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्याेग याेजना ही अतिशय चांगली याेजना आहे. या याेजनेत सुमारे ३५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. साेबतच बँक कर्जासाठी कृषी विभाग प्रयत्न करणार आहे. ज्यांना उद्याेग स्थापन करण्याची इच्छा आहे, त्यांनी नक्कीच अर्ज करावा. बेराेजगार व्यक्ती, बचतगट, संस्था यांना चांगली संधी चालून आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. - भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, गडचिराेली.