शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
3
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
4
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
5
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
6
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
7
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
8
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
9
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
10
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
11
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
12
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
13
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
14
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
15
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
17
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
18
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
19
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

पालिकेने केली २२ लाखांची कर वसुली

By admin | Published: February 11, 2016 12:03 AM

सन २०१५-१६ हे आर्थिक वर्ष ३१ मार्च २०१६ रोजी संपणार आहे.

२० दिवसांत : वसुली पथकाचा पुढाकार; थकबाकीदारांना ३१ मार्चपर्यंतचा अल्टीमेटमसन २०१५-१६ हे आर्थिक वर्ष ३१ मार्च २०१६ रोजी संपणार आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरीस ३१ मार्चपर्यंत नगर पालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत प्रशासनाने थकीत कर वसुली करून शासनाला सहकार्य करावे, अशा सूचना शासनस्तरावरून जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने गडचिरोली, देसाईगंज नगर पालिकेला पत्रान्वये ३१ मार्चपर्यंत थकीत जुनी व चालू वर्षातील गृह व पाणी कराची वसुली करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर गडचिरोली पालिकेने कर वसुलीसाठी पाच पथक गठित केले. प्रत्येक पथकामध्ये दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सदर कर वसुली पथकातील कर्मचारी गडचिरोली शहरातील सर्व वॉर्डात फिरून कुटुंबधारकांकडून गृह व पाणी कराची वसुली करीत आहेत. १८ जानेवारी रोजी नगर पालिकेने ९७ हजार रूपयांची मालमत्ता (गृहकर) वसुली केली. १९ जानेवारीला ४५ हजार, २२ जानेवारी ४८ हजार, २५ ला ६९ हजार, २७ ला ७८ हजार, २८ ला ५३ हजार, २९ ला ४७ हजार, ३० ला ५७ हजार रूपयांची कर वसुली केली. १ फेब्रुवारीला १ लाख १५ हजार, २ ला १ लाख ३ हजार, ३ ला २ लाख ५९ हजार, ४ ला १ लाख ४९ हजार, ५ ला १ लाख ४ हजार, ६ ला १ लाख १० हजार व ८ ला १ लाख २ हजार रूपये असे एकूण १६ लाख १८ हजार ५०० रूपयांची कर वसुली केली आहे. पालिकेने २० दिवसांच्या कालावधीत एकूण ५ लाख ८२ हजार रूपयांची पाणीपट्टी कर वसुली केली आहे. यामध्ये २२ जानेवारी ३७ हजार ७००, २५ ला ३७ हजार ४००, २७ ला ३५ हजार, २८ ला २४ हजार ८००, २९ ला ४५ हजार, ३० ला ३५ हजार ६००, १ फेब्रुवारीला ७६ हजार ६००, २ ला ६५ हजार, २ ला ६७ हजार, ४ ला ५० हजार ५००, ५ ला ५८ हजार, ६ ला ५३ हजार व ८ फेब्रुवारीला ४५ हजारांची वसुली केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)सधन कुटुंब प्रमुखांची पालिकेकडे धावगडचिरोली शहरातील २३ पैकी अर्ध्याअधिक वॉर्डात सधन कुटुंब वास्तव्यास आहेत. कर वसुली भरण्याबाबतचे आवाहन पालिकेच्या वतीने लॉऊडस्पिकरच्या माध्यमातून करण्यात आले होते. याची दखल घेऊन सधन कुटुंबातील अनेक नागरिक थेट पालिकेच्या कर विभागातून जाऊन कराचा भरणा करीत असल्याचे दिसून येते.