शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

मृत्यू व निपुत्रिक हाेण्याच्या अफवांमुळे लसीकरणात खाेडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 5:00 AM

प्रत्येक प्राथमिक आराेग्य केंद्रावर कायम स्वरूपी लसीकरण केंद्र ठेवण्यात आले आहे. तसेच माेठ्या गावांमध्ये शिबिर घेतले जात आहे. मात्र, गावात लसीकरण केंद्र असूनही व लस माेफत दिली जात असतानाही काही गावांमध्ये लसीकरणाविषयी चुकीच्या अफवा पसरल्या असल्याने अनेक नागरिक स्वत:हून लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लसीकरणाची गती पाहिजे त्या प्रमाणात वाढत नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देजागृतीसाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेना प्रतिबंधात्मक लस घेतल्यास व्यक्तीचा मृत्यू हाेते, मूल हाेत नाही, शरीर आणखी कमजाेर हाेते, अशा चुकीच्या अफवा पसरल्या असल्याने गावात लसीकरण केंद्र असूनही नागरिक लसीकरण करून घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. या नागरिकांच्या शंका दूर करताना प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. काेराेना साथ राेखण्यासाठी लसीकरण करणे हाच प्रभावी उपाय असल्याने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हाेईल यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. प्रत्येक प्राथमिक आराेग्य केंद्रावर कायम स्वरूपी लसीकरण केंद्र ठेवण्यात आले आहे. तसेच माेठ्या गावांमध्ये शिबिर घेतले जात आहे. मात्र, गावात लसीकरण केंद्र असूनही व लस माेफत दिली जात असतानाही काही गावांमध्ये लसीकरणाविषयी चुकीच्या अफवा पसरल्या असल्याने अनेक नागरिक स्वत:हून लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लसीकरणाची गती पाहिजे त्या प्रमाणात वाढत नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामसेवक, तलाठी, आराेग्य सेवक यांच्यामार्फत गावातील प्रत्येक लाभार्थ्याच्या नावाची यादी बनवून प्रत्यक्ष घरी जाऊन लसीकरण करण्याचे आवाहन करीत आहेत. तरीही काेही नागरिकांच्या मनातून अफवांचे भूत जात नसल्याने लस घेण्यास तयार हाेत नसल्याचे दिसून येत आहे. अफवांचे पीक प्रामुख्याने दुर्गम भागात अधिक असल्याचे दिसून येत आहे. 

काय आहेत अफवा?

वांझपणा येतो काेराेनाची लस घेतल्यास पुरुष असाे की महिला, त्याला भविष्यात मूल हाेत नाही. एखादा नवयुवक लस घेण्यास तयार झाला तरी त्याच्या घरचे इतर वयस्क सदस्य त्याला लस घेऊ देत नाहीत. अविवाहित मुलींना तर लसीकरणासाठी प्रतिबंधच घातला जात आहे. काेराेनाची टेस्ट केली जाते लस देण्यापूर्वी काेराेना चाचणी केली जाते. काेराेना चाचणी पाॅझिटिव्ह आल्यास त्याला जवळच्या काेविड केअर सेंटरमध्ये किंवा रुग्णालयात भरती केले जाते, अशी अफवा आहे.शरीर कमजाेर हाेेते काेराेनाची लस घेतल्यानंतर ताप येतो. हे शरीर कमजाेर हाेण्याची लक्षणे आहेत. शरीरात अनेक बदल घडून येतात. हाडे दुखण्याचा त्रास सुरू हाेतो, अशी अफवा पसरली असल्याने नागरिक लस घेण्यास तयार हाेत नाही.

गावकरी काय म्हणतात?

काेराेना लसीबाबत नागरिक सांगतात ते खरे मानायचे की कर्मचारी सांगतात ते खरे मानायचे, असा प्रश्न आहे. आमच्या गावातच दवाखान्यात लसीकरण केंद्र आहे. मात्र, आमच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीने लस घेतली नाही. कर्मचारी सांगत आहेत. तर लस घेण्याचा विचार सुरू आहे. -गावकरी 

नागरिकांमध्ये याेग्य ती जागृती करण्याची जबाबदारी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक या स्थानिक स्तरावरील कर्मचाऱ्यांची आहे. मात्र, हे कर्मचारी काेराेनाच्या नावाखाली गावात येतच नाहीत. केवळ आराेग्य कर्मचारी लसीकरणाचा डबा धरून येतात. मात्र, नागरिक लसीकरणासाठी येत नाहीत. काही निवडक नागरिक येतात.  त्यांना लस दिली जाते. त्यामुळेेच अनेक गावांमध्ये २५ टक्के नागरिकांचेसुद्धा लसीकरण झालेले नाही. -संदीप कुळमेथे, नागरिक 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या