शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

शहीद पोलिसांचे बलिदान सदैव स्मरणात राहील

By admin | Published: October 22, 2016 2:00 AM

नक्षल्यांचा बिमोड करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी, जवान सातत्याने प्रयत्नशील आहेत.

अभिनव देशमुख : शहीद पोलीस जवानांना आदरांजलीगडचिरोली : नक्षल्यांचा बिमोड करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी, जवान सातत्याने प्रयत्नशील आहेत. मात्र नक्षल्यांशी जंगलात मुकाबला करताना काही पोलीस अधिकारी व जवान शहीद झाले. अशा शहीद पोलीस अधिकारी व जवानांचे बलिदान कायम स्मरणात राहील, असे प्रतिपादन गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले. शुक्रवारी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात पोलीस हुतात्मा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, पोलीस अधीक्षक गृह गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, परिविक्षाधिन उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील आदी उपस्थित होते. १ सप्टेंबर २०१५ ते ३१ आॅगस्ट २०१६ या कालावधीत संपूर्ण भारतात पोलीस दलातील एकूण ४७३ अधिकारी, कर्मचारी कर्तव्य बजावित असताना शहीद झाले. त्यांच्या नावाचे वाचन यावेळी करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात चालू वर्षात शहीद झालेले पोलीस शिपाई दीपक मुकूंदा सडमाके, पोलीस हवालदार नानाजी नागोसे व पोलीस शिपाई बंडू घिसू वाचामी या वीर जवानांना पोलीस पथकाद्वारे बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांनी शहिदांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. काही अडचण भासल्यास संपर्क करा, असे आवाहन केले. शहीद कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सर्व पोलीस अधिकारी सहभागी आहोत, असे त्यांनी सांगितले. पोलीस कर्मचारी, शहीद पोलिसांचे कुटुंबीय व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)