लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धान हे मुख्य पीक असणाºया गडचिरोलीसह पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यात ‘सगुणा’ तंत्रज्ञानातून धान लागवड करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पुढाकार घेतला आहे. त्याची सुरूवात विदर्भात गडचिरोली जिल्ह्यापासून करण्यात आली आहे. यात यावर्षी जवळपास दीडशे शेतकºयांनी २०० एकर शेतीत सगुणा पद्धतीने धान लागवड करीत नवीन तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.शेतकºयांचा धान लागवड खर्च कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातल्या नेरळ तालुक्यातील चंद्रशेखर भडसावळे या शेतकºयाने हे तंत्रज्ञान शोधून काढले. तिथे ते यशस्वी झाल्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या गडचिरोलीच्या जिल्हा व्यवस्थापिका कांता मिश्रा यांनी हे तंत्रज्ञान या जिल्ह्यात आणण्याचे ठरविले. त्यासाठी कृषी विभागाने आर्थिक सहकार्य करण्यास सहमती दर्शविली. याशिवाय तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठीही कृषी विभाग व ‘आत्मा’ने मदत केली. गेल्यावर्षी महिला बचत गटांच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबात ही माहिती देण्यात आली. पण केवळ ५६ शेतकºयांनी त्याला प्रतिसाद दिला. त्यांनी आपल्या १३५ एकर शेतात सगुणा पद्धतीने धानाची लागवड केली. हा प्रयोग यशस्वी होऊन धान लागवडीचा खर्च कमी होऊन उताराही चांगला आल्यामुळे यावर्षी १५० शेतकºयांनी यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकाºयांनी दिली.महिला शेतकºयांना या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी ५० महिलांना रायगडमध्ये नेऊन त्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. ग्रामीण भागात गावोगावी रात्रीच्या बैठका घेऊन गावकºयांना याची माहिती दिली. त्यामुळे नागरिक हळूहळू हे तंत्रज्ञान आत्मसात करीत आहेत.शेतकरी कोणतीही नवीन पद्धत, प्रयोग करून पाहण्यासाठी घाबरतो. कारण प्रयोग फसला तर खाणार काय, अशी भिती त्याला असते. पण ज्यांनी हा प्रयोग केला त्यांनी समाधान व्यक्त करीत पुन्हा त्यासाठी पुढाकार घेतला आहे. नवीन शेतकºयांनी संपर्क केल्यास त्यांना योग्य मार्गदर्शन केले जाईल.- कांता मिश्रा, जिल्हा व्यवस्थापकमहिला आर्थिक विकास महामंडळसुरूवातीला एकरी २५०० हजार खर्चया पद्धतीच्या लागवडीत एकरी २५०० रुपये खर्च येतो. टोकण यंत्र १५०० रुपयांचे आहे. ते शेतकºयांना ७०० रुपयांत दिले जाते. याशिवाय एका एकराला द्यावयाचे तणनाशक ६०० रुपयाला पडते. हा एकदाचा खर्च झाल्यानंतर नंतरच्या वर्षी वाफे करण्याचा खर्च वाचतो. या पद्धतीत मजुरी कमी लागते. नांगरणी, चिखलणीचा खर्च वाचतो. विशेष म्हणजे एकदा गादीवाफे तयार केल्यानंतर २० वर्षे नांगरणीची गरज नाही.जमिनीचा कस कायम राहतोया लागवड तंत्रामध्ये कमी पाण्यातही पीक चांगले येते. साच्यामुळे रोपांमधील नेमके अंतर राखले जाते. पीकाची मुळे जमिनीतून बाहेर न काढता तिथेच कुजविली जात असल्यामुळे जमिनीचा सेंद्रीय कर्ब वाढतो. त्यामुळे रोग व कीडींचा प्रादुर्भाव कमी होतो. रोवणीसाठी पावसाची वाट पाहण्याची गरज नाही. यामुळे पीक वाया जाण्याची शक्यता नसते. या तंत्राने दुप्पट आणि दर्जेदार पीक येते.चिखलणी, रोवणीला पूर्णविरामया पद्धतीत शेताची मशागत आणि गादीवाफे एकदाच करावे लागतात. कोणताही चिखल न करता त्या वाफ्यावर टोकण यंत्राच्या (एसआरटी) मदतीने छिद्रे करून त्यात धानाच्या दोन बिया टाकाव्या लागतात. त्यानंतर गोल ही तणनाशक औषधी टाकावी लागते. पीकाला पाटाचे वाहते पाणी, ठिबक किंवा तुषार पद्धतीने पाणी द्यावे. या पद्धतीमुळे नर्सरी, चिखलणी, रोवणी करण्याची गरज पडत नाही.
‘सगुणा’ तंत्रज्ञान ठरणार वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:24 AM
धान हे मुख्य पीक असणाºया गडचिरोलीसह पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यात ‘सगुणा’ तंत्रज्ञानातून धान लागवड करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पुढाकार घेतला आहे.
ठळक मुद्देधान लागवड खर्चात कपात : ‘मआविम’च्या पुढाकाराने दीडशे शेतकºयांकडून लागवड