याप्रसंगी साेनाली चांदेवार यांनी रक्षाबंधन गीत तर सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी देशभक्ती गीत सादर केले. कल्पना कापसे यांनी शहीद जवानांनी आपल्या मातेला लिहिलेल्या पत्रांचे वाचन केले, तर ऋषभ, कनक व रिषिका यांनी नृत्य सादर केले. काेराेनाकाळात सीआरपीएफ जवानांना गावकऱ्यांना सहकार्य केले हाेते. त्यामुळे देसाईगंज, विसाेरा, कुरुड, काेंढाळा येथील सखींनी हा कार्यक्रम आयाेजित केला हाेता. याप्रसंगी सरपंच अपूर्वा राऊत, पाेलीस पाटील किरण कुंभलवार, भामिला सहारे, भारती उपाध्याय, चिराग श्यामदासानी उपस्थित हाेते.
कार्यक्रमाचे संचालन निमा रणदिवे, तर आभार नारायण वैद्य यांनी मानले. यशस्वीतेसाठी पिंकी ठकरानी, दीपा काेकाेडे, ममता रामटेके, सराेज कुंदनवार, स्मिता दहिकर, रमा वैद्य, ज्याेती उके, कल्पना शिंगाडे, राधिका वैद्य, संध्या पनपालिया, काबरा तसेच कुरुड, काेंढाळा, विसाेरा, देसाईगंज येथील सखी सदस्य व सीआरपीएफ जवानांनी सहकार्य केले.