दरवर्षी एप्रिल व मार्च महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना उशिरा मिळते. त्यामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांना वेतनाअभावी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागताे. ही समस्या केवळ अनुदानित शाळांचीच नाही तर जिल्ह्यातील २० टक्के अनुदानित शाळांच्या कर्मचाऱ्यांसमाेरही निर्माण हाेते. वेतन पथक गडचिरोलीकडून केवायसी स्टेट बँकेत सादर करूनही अद्यापही जिल्ह्यातील शाळांतील कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही. यासाठी २ कोटी ९ लाख रुपयांचा धनादेश जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सादर करण्यात आला नाही. त्यामुळे शाळांतील कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार यांनी वारंवार भेट देऊन ही समस्या निकाली काढण्याची मागणी केली. मात्र काहीच कार्यवाही झाली नाही. स्टेट बँक मुख्य शाखेच्या गलथान कारभारामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित राहावे लागत आहे, असा आराेप करीत स्टेट बॅंकेतील खाती काढून घ्यावी, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.
एसबीआयच्या गलथान कारभारामुळे वेतन थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 4:36 AM