शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
3
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
4
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
6
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
7
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
8
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
9
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
11
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
12
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
13
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
14
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
15
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
16
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
17
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
18
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
19
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
20
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात

बनावट सुगंधी तंबाखू विक्रीतून आरमोरीत लाखोंची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 5:05 PM

कोणाचा आशीर्वाद : ग्रामीण भागात फोफावला अवैध धंदा

लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : तालुक्यात बनावट सुगंधित तंबाखूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावत चालला आहे. यातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आरमोरी व तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून बनावट सुगंधित तंबाखू विक्रीचा अवैध व्यवसाय राजरोस सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र, या व्यवसायाचा खतपाणी मिळत असल्याने ठोक व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले असून, या धंद्यातून काही माफियांनी मोठी माया जमविल्याचे सांगितले जाते. शासनाने प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा विक्रीवर बंदी करणारा कठोर कायदा केला असला तरी त्याची अंमलबजावणी येथे तरी होत नाही, असे दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याने व्यावसायिक हे मालामाल झाले आहे.

असे चालते नेटवर्क

• वैरागड, ठाणेगाव, आरमोरी, पिसेवडधा ही व्यावसायिकांची प्रमुख केंद्र आहेत. तसेच देसाईगंज येथील ठोक व्यावसायिक यांच्याकडून आरमोरी येथील किराणा दुकानदार यांना बनावट सुगंधित तंबाखूचा पुरवठा केला जात आहे. या भागातील ठोक व्यावसायिकांचे नेटवर्क तालुक्यासह जिल्ह्यांतील इतर भागात पोहोचले आहेत.• लहान किराणा दुकानदारांना सदर माल पुरवठा केला जातो व किराणा दुकानदाराकडून पानटपरीवाल्यांना पुरवठा केला जात आहे.

पाळेमुळे खोलवर

• तालुक्यात बनावट सुगंधित तंबाखू तयार करून त्याची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत.• साधा तंबाखू नागपूर व नजीकच्या छत्तीसगड राज्यातून आणून त्यावर केमिकलद्वारे प्रक्रिया करून व मशीनद्वारे पॅकिंग करून बनावट सुगंधित तंबाखू तयार केली जाते. • तयार केलेला लाखों रुपयांची बनावट तंबाखू शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज वाहनाद्वारे पोहोच केली जात आहे.

गुन्हे शाखेची कारवाई, स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष कसे?

• दिवसांपूर्वी गडचिरोली येथील गुन्हे शाखेच्या चार पोलिसांनी ठाणेगाव टी पॉइंटवर पाळत ठेवून अवैधपणे वाहतूक करीत असलेला १८ लाखांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केली होती.•याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले होते. गुन्हे शाखा कारवाई करते, मग स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कायद्यानुसार निश्चितच कारवाई केली जाईल. यामध्ये कुणाचीही गय जाणार नाही.- विनोद रहांगडाले, पोलिस निरीक्षक, आरमोरी

 

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदीGadchiroliगडचिरोलीarmori-acअरमोरी