येथील आंबेडकर भवनातून तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. प्रमुख मार्गाने फिरत तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचला त्यानंतर उपविभागीय अधिकारी समाधान शेडगे व तहसीलदार सोमनाथ माळी यांना निवेदन सादर करण्यात आले.
या मोर्चात अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, कुरखेडा येथील माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, महेंद्र माने, समता सैनिक दलाचे मुक्ताची दुर्गे, डॉ. जयप्रकाश भोंगळे, रिपब्लिक पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष माजी पोलीस पाटील नारायण टेंभुर्णे, कृष्णा चौधरी, महिला मंडळाच्या पदाधिकारी माधुरी ढवळे, संघामित्रा ढवळे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस हंसराज उंदीरवाडे, अशोक खोब्रागडे, योगेश टेंभुर्णे, ॲड.उमेश वालदे, मनीषा राऊत आदी सहभागी झाले. या हत्या प्रकरणातील आरोपीला दोन दिवसात पोलीस विभागाने अटक न केल्यास सर्वपक्षीय तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या मोर्चात कुरखेडा व परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
230721\img-20210723-wa0160.jpg~230721\img-20210723-wa0161.jpg
तहसिलदार सोमनाथ माळी याना निवेदन देताना समाज बांधव~उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देताना समाज बांधव