रत्नाकर बाेमीडवारचामाेर्शी : चामाेर्शी तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या रेती घाटांचे लिलाव न झाल्याने अवैध रेती खनन केले जात आहे. झटपट बक्कळ पैसा कमावून श्रीमंत हाेण्याचा अवैध धंदा सध्या चामाेर्शी तालुक्यात जाेमात सुरू आहे. परंतु या प्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते.चामाेर्शी तालुक्याच्या सीमेवरुन बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर गणपूर, दाेटकुली, बाेरघाट, जयरामपूर, वाघाेली, माेहाेर्ली, तळाेधी माेकासा, कुरूळ आदी गावातील रेती घाटांचा लिलाव झाला नाही. त्यामुळे विविध बांधकामांसाठी रेती चाेरुन विक्री करण्याचा धंदा अनेकांनी सुरू केला आहे. झटपट श्रीमंत हाेण्यासाठी काही व्यावसायिक माेठ्याप्रमाणावर रेतीची चाेरी रात्रीच्या सुमारास करुन त्याची विक्री करीत आहेत. परिणामी शासनाचा काेट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. गडचिराेली जिल्ह्यात २५ रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया प्रस्तावित हाेती. परंतु यातील १० घाटांचा लिलाव झाला. मात्र तेथेसुद्धा अद्यापही प्रत्यक्ष रेती खननाला सुरूवात झाली नाही. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवरील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नाही. त्यामुळे तालुक्यात रेती तस्करीचे प्रमाण वाढले आहे. वैनगंगा नदीघाटावरुन सुरू असलेल्या रेती तस्करीची उच्चस्तरीय चाैकशी करुन दाेषींवर कारवाई करावी. तसेच रेती घाटांचे लिलाव करुन सामान्य जनतेला वाजवी दरात रेती उपलब्ध करावी, अशी मागणी नागरिकांची आहे.
रेती तस्करीत अदृश्य हात?चामाेर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीवरील घाटांचे लिलाव न झाल्याने रात्रीच्या सुमारास रेती तस्करीचे प्रमाण वाढले आहे. परंतु या प्रकारात अनेकांचे अदृश्य हात असल्याची चर्चा आहे. रात्री रेतीचा उपसा करुन ढीग तयार करणे, नंतर महसूल प्रशासनाने ’ताे’ अवैध साठा जप्त करणे, अज्ञात व्यक्तीने रेती साठा करुन ठेवल्यामुळे ताे जप्त करुन लिलाव करणे. लिलाव प्रक्रियेत त्याच तस्करांनी भाग घेऊन साठा साेडविणे, असा गैरप्रकार सर्रास सुरू आहे, असे नागरिकांमध्ये दबक्या आवाजात बाेलले जात आहे. या सर्व अवैध प्रक्रियेत अदृश्य हात कुणाचे आहेत याचा शाेध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.