गुडीगुडम : सांडरा-अहेरी बायपास मार्गावर अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले असल्याने या मार्गाचा प्रवास खडतर बनला आहे. २००४ मध्ये सदर मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर दुरुस्ती करण्यात आली नाही.
सिराेंचा राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या वाहनधारकांना जवळपास सात ते आठ कि.मी. अंतर कमी पडते. तालुकास्थळी जाण्यास सोयीस्कर मार्ग म्हणून या मार्गाला पसंती आहे. अहेरी तालुक्यातील रस्त्याच्या समस्येबाबत अजूनही वाहनधारकांना व नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. कारण गडचिरोली जिल्ह्यात रस्त्याची समस्या अजूनही कायम आहे.
सदर सांडरा बायपास अहेरी मार्ग तालुकास्थळी जाण्यास जवळचा व सोयीस्कर ठरतो म्हणून बहुतांश वाहनधारक व कर्मचारी व नागरिक याच मार्गाचा अवलंब करतात. सांडरा बायपास मार्गाने गेल्यास सांडरा, व्यंकटरावपेठा, गडअहेरी व अहेरी तसेच सांडरापासून डाव्या बाजूला गेल्यास इंदाराम गाव येते, मार्ग जवळ हाेत असल्याने या मार्गाचा वापर वाढला आहे.