शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

रस्ता कामासाठी सर्रास वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:01 PM

रवी रामगुंडेवार। लोकमत न्यूज नेटवर्क एटापल्ली : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत यावर्षी तालुक्यात प्रथम अनेक रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. या ...

ठळक मुद्देवनविभागाकडे कामाची माहितीच नाही : राखीव जंगलातून गौण खनिजाचे अवैध खनन सुरू

रवी रामगुंडेवार।लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत यावर्षी तालुक्यात प्रथम अनेक रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. या कामावर पोकलँड, जेसीबी, ट्रॅक्टरचा वापर करून घनदाट राखीव जंगलातून गौण खनिज तसेच नाल्यातील रेती, मुरूम, माती, दगड व गिट्टीचे अवैधरित्या खनन सुरू आहे. यासाठी शेकडो झाडांची कत्तल केली जात आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे वनकर्मचाऱ्यांचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.संपूर्ण एटापल्ली तालुका घनदाट जंगलांनी व्यापलेला असून तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्र वनविभागाच्या हद्दीत येते. तालुक्यात १९७ गावे असून अनेक लहान गावे घनदाट जंगलात वसलेली आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याच्या कामासाठी गौण खनिजाचे या भागात अवैध खनन सुरू आहे. परिणामी लाखो रूपयांच्या शेकडो झाडांची कत्तल केली जात आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. तसेच अनेक महिने आपल्या क्षेत्रात हे अधिकारी व कर्मचारी जाऊन पाहणी करीत नसल्याने आपल्या हद्दीतील जंगलात काय सुरू आहे, याची साधी माहितीसुद्धा वनाधिकारी व कर्मचाऱ्यांना नाही.भामरागड वनविभागाअंतर्गत वनपरिक्षेत्र एटापल्लीच्या हद्दीतील देवदा उपकेंद्र बिट गट्टेपल्ली कुप नं.२४३, २४४ या क्षेत्रातील राखीव जंगलातून हालेवारा-वट्टेगट्टा-गट्टेपल्ली या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काम सुरू करण्यात आले आहे. सदर रस्ता कामासाठी डझनभर पोकलँड व जेसीबीच्या सहाय्याने शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली. मुरूमासाठी तीन मोठे खड्डे खोदून मुरूम काढण्यात आले. हालेवारा-वट्टेगट्टा-गट्टेपल्ली या १० किमी रस्त्याच्या कामासाठी संबंधित कंत्राटदाराने इतर राज्यातील तब्बल १० पोकलँड व पाच जेसीबी वाहने कामावर आणली आहेत. परप्रांतीय मजूर लावून पाच दिवसांच्या कालावधीत रात्रंदिवस काम करून सदर रस्त्याचे मातीकाम पूर्ण करण्यात आले.सदर मार्ग पूर्वी अरूंद व कच्चा होता. या मार्गाच्या दोन्ही बाजूस घनदाट राखीव जंगल आहे. संबंधित कंत्राटदाराने या रस्ता कामाची कुठलीही माहिती वनविभागाला दिली नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जेसीबी व पोकलँडच्या सहाय्याने मोठी नाली खोदून त्यातील मुरूम रस्त्यावर टाकले. या कामात अनेक झाडे तोडल्या गेली. नाली खोदकामात शेकडो मोठ्या झाडांचे मूळ बाहेर निघाले असल्याने ही झाडे पाऊस व वादळाने कोसळण्याची शक्यता आहे. याच रस्त्यावर परत मुरूम टाकण्यासाठी हालेवारा-वट्टेगट्टादरम्यान रस्त्याच्या थोड्या अंतरावर जंगलात मुरूमासाठी तीन मोठ्या खाणी तयार करण्यात आल्या आहेत.सदर रोडकाम परवानगी संदर्भात विचारणा केली असता, एटापल्लीचे नियमित व प्रभारी या दोन्ही वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना माहिती नसल्याचे समजले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.मी प्रशिक्षणाकरिता गेलो असल्याने माझा प्रभार दुसºया वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे दिला आहे. त्यामुळे याबद्दल मला माहिती नाही. तरी पण चौकशी करून कारवाई करू.- संजूदास राठोड, वनपरिक्षेत्राधिकारी, एटापल्लीवनपरिक्षेत्राधिकाऱ्यांचा प्रभार आपण नुकताच चॉर्जपूर्वीच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांकडे दिला आहे. रोड कामाची परवानगीबाबतचे कुठलेच कागदपत्र आमच्या कार्यालयात नाही.- सुहास पाटील, प्रभारी वनपरिक्षेत्राधिकारी, एटापल्ली