ग्रामपंचायतमध्ये १५ फेब्रुवारीला सरपंच, उपसरपंच यांची निवडणूक सदस्यांचे हात उंचावुन झाली होती. यानंतर विजय उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यावेळी सपना कोडापे सरपंचपदी तर सुधाकर टेकाम उपसरपंचपदी विजयी झाले होते. निवड प्रकिया पार पडल्यानंतर काही दिवसांनी काही सदस्यांनी गुप्त मतदान घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. तक्रार दखल करून घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ३१ मार्चला फेरनिवडणूक झाली.
९ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदाकरीता सपना कोडापे व लक्ष्मी कुमरे तर उपसरपंचपदाकरीता सुधाकर टेकाम व मुकेश कावळे रिंगणात होते. सरपंच सपना कोडापे व उपसरपंच सुधाकर टेकाम यांना तीन मते अधिक पडून ते विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसची एकमेव सदस्य सपना कोडापे यांनी सरपंचपदी बाजी मारली.
ही निवडणुक तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या उपस्थितीत पार पडली.