पेरमिली ग्रामपंचायतीवर आविसंचे वर्चस्व
पेरमिली येथील ग्रामपंचायत भवनात सरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यासी अधिकारी म्हणून व्ही. बी. मलेवार हाेते. ग्रामपंचायत निवडणुकीत ११ सदस्य निवडून आले हाेते. यात आविसं समर्थित आठ व भाजप समर्थित तीन सदस्यांचा समावेश हाेता. सरपंच पदाच्या निवडणुकीत किरण अरुण नैताम यांनी बाजी मारली तर उपसरपंचपद सुनील ऋषी साेयाम यांनी मिळविले. यावेळी ग्रा. पं. सदस्य साजन गावडे, राजेंद्र इष्टाम, सरका सडमेक, सुधाकर दुर्गे, वच्छला कांबळे, राजक्का आत्राम, प्रमाेद आत्राम, सरिता वेलादी, सपना बेडमवार आदी उपस्थित हाेते. माजी सरपंच प्रमाेद आत्राम यांनी आपल्या गटाचे वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळविले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी निवडीचे श्रेय माजी आ. दीपक आत्राम, उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना दिले.
कमलापूर ग्रा. पं. वर आविसंचा ताबा
अहेरी तालुक्याच्या कमलापूर ग्रामपंचायतीवर आदिवासी विद्यार्थी संघ समर्थित गटाने बाजी मारली. सरपंचपदासाठी श्रीनिवास रामय्या पेंदाम व किष्टा मासा गावडे यांनी नामांकन दाखल केले हाेते. यात श्रीनिवास पेंदाम यांचा विजय झाला तर उपसरपंचपदासाठी सचिन रमनया ओलेटीवार यांचा एकच अर्ज आल्याने ते अविराेध निवडून आले. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून तलाठी आर. एन. देवतळे यांनी काम पाहिले. याप्रसंगी सचिव एल. के. पाल उपस्थित हाेते. पं. स. सभापती भास्कर तलांडे यांच्या नेतृत्वात कमलापुरात आविसंने बाजी मारली. तर रेनपल्ली ग्रामपंचायतीत आविसं गटाच्या लक्ष्मी मडावी यांची सरपंचपदी तर विलास नेरला यांची उपसरपंचपदी अविराेध निवड झाली.
आमगाव ग्रा. पं. वर सर्वधर्मसमभाव पॅनलचा ताबा
देसाईगंज तालुक्यातील आमगाव ग्रामपंचायतीवर सर्वधर्मसमभाव पॅनलने ताबा मिळविला असून सरपंचपदी रत्नमाला सुरेश गेडाम तर उपसरपंचपदी प्रभाकर मुरारी चाैधरी यांची वर्णी लागली आहे. सरपंचपदासाठी रत्नमाला गेडाम व सुरेखा ढाेरे यांनी नामांकन दाखल केले हाेते. परंतु रत्नमाला गेडाम यांना सहा तर सुरेखा ढाेरे यांना चार सदस्यांची मते मिळाली. त्यामुळे रत्नमाला गेडाम विजयी ठरल्या. उपसरपंच पदासाठी प्रभाकर चाैधरी व वर्षा कांबळी यांनी नामांकन दाखल केले. यात चाैधरी यांना सहा तर कांबळी यांना चार मते मिळाली. त्यामुळे चाैधरी हे विजयी झाले. सत्तेवर येणाऱ्या गटाला राजेश्वर काेल्हे, श्रीराम भाेयर, श्रीधर पाटील, रुपलता बाेदेले आदी ग्रा. पं. सदस्यांचे समर्थन लाभले. तर विराेधी गटाला याेगेश नागताेडे, लता सिद्धमवार यांनी मतदान केले. निवडणूक प्रक्रियेप्रसंगी नंदू ठाकरे, संपत कावळे, माधव चंडीकार, केवळराम घाेरमाेडे, अरूण कुथे, हर्षवर्धन कुथे, आनंदराव वाढई, सुरेश नखाते, केशर नंदेश्वर, देवराव पाटील उपस्थित हाेते.
पलसगड गट ग्रामपंचायत महिलांच्या ताब्यात
कुरखेडा तालुक्यातील पलसगड गट ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक १५ फेब्रुवारीला पार पडली. परंतु ही निवड बिनविराेध झाली. नऊ सदस्यीय गट ग्रामपंचायतीत प्रभाकर तुलावी गटाचे पाच सदस्य निवडून आले हाेते. त्यामुळे याच गटाने सत्ता काबीज केली. सरपंचपदी मीनाक्षी गणेश गेडाम तर उपसरपंचपदी विष्णू रामचंद्र गुरनुले यांची निवड झाली. याप्रसंगी अध्यासी अधिकारी म्हणून कुरखेडा पाणीपुरवठा विभागाचे अभियंता अनिल पुराम यांनी काम पाहिले. यावेळी ग्रा. पं. सदस्य कैलास परसाे, यामिना तुलावी, रामप्रसाद सेनकपाट तसेच ग्रामसेवक गाेपाल सराटे, जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी, विश्वनाथ तुलावी, शामिना उईके, उमाजी धुर्वे, माराेती जनबंधू, रामदास मडावी, यशवंत उईके, अभय गुरनुले, देवाजी दरवडे, प्रशांत उईके, रेशीम माेहुर्ले, क्रिष्णा बिनायक, डाकराम कसारे, सागर पाेटावी, संदीप तुलावी, पत्रकार सुकेश कसारे उपस्थित हाेते.
तिमरम ग्रा. पं. मध्ये सरपंच व उपसरपंच अविराेध
अहेरी तालुक्यातील तिमरम (गुड्डीगुडम) ग्रामपंचायतमध्ये सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक अविराेध पार पडली. सरपंचपदी सराेजा अनिल पेंदाम तर उपसरपंचपदी प्रफुल्ल रामन्ना नागुलवार यांची निवड झाली. नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीत अपक्ष नागुलवार गटाचे संपूर्ण उमेदवार निवडून आले हाेते.