लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिंचनाच्या मर्यादित सुविधा, त्यात पारंपरिक धानपिकाशिवाय दुसरे पीक घेण्याची हिंमत आणि मार्गदर्शन नसल्यामुळे जिल्ह्यातील सामान्य शेतकरी शेतीतील वेगळ्या प्रयोगाकडे कधी वळलेच नाही. पण अलिकडे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन विभागाच्या (आत्मा) मार्गदर्शनातून बचत गटासोबत जोडलेल्या काही शेतकऱ्यांना हिंमत मिळाली आणि त्यांच्या शेतात आता सुर्यफुलाचे पीक डोलू लागले आहे.कुरखेडा तालुक्यातील नवरगाव येथील ११ शेतकºयांनी शेतकरी पुरूष बचत गटाची स्थापना करून ११ एकरात सुर्यफुलाची लागवड केली. ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार यांनी त्या शेतकऱ्यांना नगदी पिकांकडे वळण्याचा सल्ला देत कोणकोणती पिके ते घेऊ शकतात यासंदर्भात मार्गदर्शन केले. नगदी पिकांमुळे कमी-जास्त पाऊस किंवा कीडीच्या प्रादुर्भावामुळे घटणारे पिकांचे उत्पादन, महागडे बियाणे, कीटकनाशकासाठीवारंवार करावा लागणारा खर्च हे काही प्रमाणात नियंत्रणात येईल, ही बाब शेतकऱ्यांच्या गळी उतरविली. त्यामुळे शेतकरीही वेगळा प्रयोग करण्यासाठी तयार झाले. यातून जानेवारी २०१८ मध्ये सुर्यफुलाची लागवड केली आणि आता हे पीक चांगलेच बहरले आहे.शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष उदाराम कवाडकर यांनी सांगितले की, सुर्यफुलाच्या लागवडीसाठी एकरी ७ हजार रुपयांचा खर्च आला. एकूण जवळपास ८० हजारांचा खर्च आला. त्यातून १०० क्विंटल सूर्यफुलाचे उत्पादन होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.मधमाशी पालनही सोबतच सुरूसूर्यफुलाच्या शेतीसोबतच मधमाशी पालनाचे तंत्रही शेतकऱ्यांना दिले आहे. या शेतकºयांच्या उत्पादनात भर पडणार आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या या पिकातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास आत्माचे संचालक डॉ.प्रकाश पवार यांनी व्यक्त केला.
बचत गटांनी केली सूर्यफुलाची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 1:23 AM
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिंचनाच्या मर्यादित सुविधा, त्यात पारंपरिक धानपिकाशिवाय दुसरे पीक घेण्याची हिंमत आणि मार्गदर्शन नसल्यामुळे जिल्ह्यातील सामान्य शेतकरी शेतीतील वेगळ्या प्रयोगाकडे कधी वळलेच नाही. पण अलिकडे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन विभागाच्या (आत्मा) मार्गदर्शनातून बचत गटासोबत जोडलेल्या काही शेतकऱ्यांना हिंमत मिळाली आणि त्यांच्या शेतात आता सुर्यफुलाचे पीक डोलू लागले आहे.कुरखेडा ...
ठळक मुद्देनवरगावच्या शेतकऱ्यांचा प्रयोग : ‘आत्मा’च्या प्रशिक्षणातून नगदी पिकांकडे वळताहेत शेतकरी