लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: जिल्ह्यातील कुरखेडा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या बांधगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या वारंवार अनुपस्थितीमुळे वैतागलेल्या गावकऱ्यांनी सोमवारी शाळेला सरळ कुलूपच ठोकले. मात्र शिक्षण विभागाकडून याचीही दखल घेतली नसल्याने आज तिसऱ्या दिवशी ही शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आह.प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील बांधगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिली ते चौथी पर्यंत वर्ग असून येथे दोन शिक्षक कार्यरत असले तरी कधी एक तर कधी दोन्ही शिक्षक शाळेत गैरहजर राहत असल्याच्या पालकांच्या तक्रारीची पंचायत समिती स्तरावरून दखल घेण्यात आली नाही दरम्यान सोमवारी नेहमी प्रमाणेच विद्यार्थ्यांनीच शाळा उघडली मात्र शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचा सुरू असलेला गोंगाट ऐकून पालकांनी शाळेत अनुपस्थित असलेल्या दोन्ही शिक्षकाची दुपारी दोन वाजेपर्यंत वाट पाहून अखेरीस शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक व नागरिकांनी शाळेला कुलूप ठोकून आपला संताप व्यक्त केला. या गंभीर बाबींची शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही परिणामी आज तिसऱ्या दिवशी सुद्धा शाळा कुलूपबंद होती.याबाबत गडचिरोली जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उरकुडे यांचेशी भ्रमणध्वनीवर सम्पर्क साधला असता गैरहजर असणाऱ्या शिक्षकांचे दोन दिवसांचे वेतन कपात करण्याची करवाई करणार असल्याचे सांगितले
गडचिरोली जिल्ह्यातील जि.प. शाळेला गावकऱ्यांनी ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 3:31 PM
जिल्ह्यातील कुरखेडा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या बांधगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या वारंवार अनुपस्थितीमुळे वैतागलेल्या गावकऱ्यांनी सोमवारी शाळेला सरळ कुलूपच ठोकले.
ठळक मुद्देशिक्षक गैरहजर असल्याने पालक वैतागलेतीन दिवसांपासून शाळा बंद