गडचिराेली : काेराेनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली तरी, विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विहित मर्यादेत गुणपत्रिका देणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षण मंडळाने शाळांकडून ऑनलाईन माहिती मागविली आहे. ही माहिती ऑनलाईन पाठविण्यासाठी सध्या शाळा व शिक्षकांना धावपळ करावी लागत आहे. माहिती पाठविण्यास उशीर झाल्याने निकाल जाहीर होण्यास उशीर झाल्यास संबंधित शाळांना जाब विचारला जाणार आहे.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून त्यांच्या गुणांची माहिती बाेर्डाकडे ऑनलाईन भरण्यासाठी ३० जून २०२१ ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. सद्यस्थितीत गडचिराेली जिल्ह्यातील जवळपास ९४ टक्के शाळांनी माहिती भरली आहे. उर्वरित ६ टक्के शाळांमधील विद्यार्थ्यांचा निकाल सध्या थंडबस्त्यात आहे.
बाॅक्स...
- दहावीचा निकाल लावण्यासाठी शिक्षण मंडळाने शाळांना तांत्रिक अडचणीत टाकले आहे. त्यापेक्षा परीक्षा मंडळाने परीक्षा घेतली असती तर बरे झाले असते, अशी शिक्षकांची भावना आहे.
- नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, तुरळक विषय घेऊन बसणारे परीक्षार्थी आदींचे गुणांकन करताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत.
- दहावीच्या मूल्यमापनात प्रत्येक विषयाला १०० गुणांक दिले आहेत. मात्र नववीच्या परीक्षेत विज्ञान विषयाला १५० गुण हाेते. आता हा ताळमेळ जुळविताना शिक्षकांना त्रास हाेत आहे.
काेट...
सराव परीक्षेचे ३० गुण, इयत्ता नववीच्या निकालातील ५० गुण व ताेंडी परीक्षेचे २० अशा एकूण १०० गुणांनुसार आम्ही दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले आहे. मला मूल्यमापन, गुणदान करून निकाल तयार करताना फारशी अडचण आली नाही.
- गिरिश मुंजमकर, शिक्षक, चामाेर्शी
.................
काेट...
अडचणी फारशा नाहीत, परंतु १७ नंबरचा फॉर्म भरणारे विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी यांच्याबाबत गुणांकन करताना तांत्रिक अडचणी निर्माण हाेत आहेत. या अडचणी आम्ही मंडळापर्यंत पाेहाेचविलेल्या आहेत. शाळेतील इतर विद्यार्थ्यांचा निकाल तयार केला आहे.
- विलास मगरे, शिक्षक, जारावंडी
बाॅक्स....
- ९४ टक्केच शाळांनी टप्पा पूर्ण केला
- जिल्ह्यातील दहावीतील विद्यार्थी - १६,८५७
मुले - ८,७५६
मुली - ८,१०१