गडचिराेली : काेराेना संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने मुलं, मुली घरी बसले आहेत. दरम्यान, घरी राहून त्यांना कंटाळा असला असून मुला-मुलींचा खाेडकरपणा व चिडचिडेपणा वाढला आहे. याचा परिणामही पालकांच्या मानसिक आराेग्यावर हाेत आहे.
काेराेना संंसर्गामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद असून प्राथमिक वर्ग ऑनलाईन भरत आहेत. विद्यार्थी घरीच राहत असून त्यांचे माेबाईल हाताळणे व टीव्ही पाहण्याचे प्रकार वाढले आहेत. पालकांच्या कामात व्यत्यय आणल्या जात असल्याने पालकही चिडचिड करत आहेत. एकूणच शाळा बंदमुळे काही शाळकरी मुलांसाेबतच अनेक पालकांचेही मानसिक आराेग्य बिघडल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स ......
मुलांच्या समस्या...
चिडचिडेपणा व खाेडकरपणा वाढला.
घरी राहावे लागत असल्याने एकलकाेंडेपणा वाढला.
पालकांचे म्हणणे ऐकून न घेता मनमर्जीने वागणे.
हट्टीपणा पूर्वीपेक्षा अधिक वाढल्याचे दिसून येते.
बाॅक्स .....
पालकांच्या समस्या...
घरी असलेले शाळकरी मुले त्रास देत असल्याने पालकांचेही वर्तन बदलले आहे.
पालकांच्या वर्तनात चिडचिड व आक्रमकपणा वाढला आहे.
घरच्या कामात मुले हस्तक्षेप करत असल्याने आई-वडिलांवर ताणतणाव येत आहेत.
बाॅक्स ....
अशा कराव्या उपाययाेजना
काेराेना संकटामुळे शाळा बंद असून विद्यार्थी घरी बसले आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांना खेळण्याचे साहित्य उपलब्ध करून दिल्यास मुलं, मुलींचे वर्तन चांगले राहण्यास मदत हाेईल. गेल्या दीड वर्षांपासून विद्यार्थी घरी राहत असल्याने शाळेतून मिळणाऱ्या विविध कलाकाैशल्यापासून ते वंचित आहेत. अशा परिस्थितीत पालकांनी आपल्या पाल्यांना चित्रकला व विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजे जेणेकरून विद्यार्थी आपल्या कामात व्यस्त राहतील. पालक व विद्यार्थी आपापल्या ठिकाणी व्यस्त राहिल्यास दाेघांचेही मानसिक आराेग्य निराेगी राहण्यास नक्कीच मदत हाेते. त्यादृष्टीने पालकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.