लोकमत न्यूज नेटवर्कपलसगड : कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. मक्याला कणीस लागण्यास सुरूवात झाली असतानाच रानडुकरांचा धुमाकूळ वाढला आहे. त्यांच्याकडून पीक नष्ट केले जात आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.गडचिरोली जिल्ह्यातील जमीन व वातावरण मका पिकासाठी पोषक असल्याने हे पीक चांगले येते. काही शेतकऱ्यांनी सुरूवातीला लागवड केली. मात्र चांगले उत्पादन होत असल्याचे लक्षात आल्यानंतर इतरही शेतकऱ्यांनी अनुकरण करण्यास सुरूवात केली. त्यामुळे मागील चार वर्षात मका पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पलसगड, चारभट्टी परिसरातील शेकडो शेतकºयांनी इतर पारंपारिक पिकांना फाटा देत मका पिकाची लागवड केली आहे. मका पिकाला आता कणीस येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र डुकरांचे कळप शेतात शिरून मका पिकाची नासधूस करीत आहेत. शेवटच्या टप्प्यात पीक असताना डुकरांकडून नुकसान केले जात असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश गावे जंगलात वसली आहेत. जंगलामध्ये रानडुकर आहेत. डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.पलसगड येथील शेतकऱ्यांच्या मका पिकाचे डुकरांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर याचा पंचनामा करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी यांनी केली होती. त्यानुसार पलसगडचे वनरक्षक लाडे यांनी पंचनामा केला. या शेतकºयांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
मका पिकात रानडुकरांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:05 AM
कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. मक्याला कणीस लागण्यास सुरूवात झाली असतानाच रानडुकरांचा धुमाकूळ वाढला आहे. त्यांच्याकडून पीक नष्ट केले जात आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : पलसगड परिसरात खरीप पिकांची नासधूस