उपविभागीय अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान तहसीलदार अनमोल कांबळे, संवर्ग विकास अधिकारी राहुल चव्हाण, नगरपंचायत मुख्याधिकारी सूरज जादव, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सचिन विभुते, डॉ.भावेश वानखेडे, डॉ. निखिल कांबळे, कोविड सेंटरचे व्यवस्थापक विजय सिडाम आदी उपस्थित होते. काेराेना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील नागरिकांच्या साेयीसाठी भामरागड येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात सध्या कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. त्यात ५० बेडची सुविधा केली आहे. येथील व्यवस्था कशाप्रकारे सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मनूज जिंदल यांनी कोविड केअर सेंटरची पाहणी करून रुग्णांना दिल्या जात असलेल्या सुविधांबाबत विचारपूस केली. सकाळी चहा, नाश्ता, दूध, अंडी, फळे दिली जातात. दुपारी ४ वाजता पुन्हा चहा तसेच आठवड्यातून दोन दिवस चिकन, मटन नाॅनव्हेज दिले जाते. याशिवाय स्वच्छ पाणी दिले जाते व रुग्णांवर २४ तास डाॅक्टर व नर्सेसची देखरेख असते. रुग्णांना मनोरंजनासाठी टीव्ही तसेच स्मार्ट फोन धारकांना वायफाय उपलब्ध करुन दिले आहे. सध्या ५० बेड उपलब्ध असून ३४ रुग्ण भरती आहेत. रुग्णसंख्या वाढल्यास कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात ७५ बेडची व्यवस्था करून ठेवल्याची माहिती डाॅक्टरांनी एसडीएम व तहसीलदारांना दिली.
बाॅक्स
२४ तास सेवा अफवांवर विश्वास ठेवू नका
काेविड केअर सेंटरमध्ये २४ तास साेयीसुविधा उपलब्ध आहेत तेव्हा बाधित रुग्णांनी कुठलीही भीती न बाळगता तसेच अफवांवर विश्वास न ठेवता डाॅक्टरांच्या देखरेखीत उपचार घ्यावा. उपचाराबाबत कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा तक्रारी असल्यास मला व्यक्तीश: किंवा तहसीलदारांशी संपर्क साधावा, असे आवाहन एसडीओ मनूज जिंदल यांनी केले. तहसील कार्यालयात कोविड नियंत्रण कक्ष आहे. गावातून कोविड रुग्णांना आणण्यासाठी रुग्णवाहिका व कोविड सेंटरमधील सोयी सुविधा सर्व काही नियंत्रण कक्षाच्या अधीन आहेत. कोणत्याही अडचणी असल्यास ९१ ७१३४२२००३९ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार अनमोल कांबळे यांनी केले.
===Photopath===
090521\09gad_3_09052021_30.jpg
===Caption===
काेराेना बाधित रुग्णांशी संवाद साधताना एसडीओ मनूज जिंदल.