प्रधानमंत्री आवास योजना : गडचिरोली न.प. क्षेत्रात होणार बांधकामलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नगर पालिका क्षेत्रातील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांकरिता हक्काचे घरकूल देण्याच्या हेतूने गडचिरोली नगर पालिकेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात ५४५ घरकूल तयार करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर घरकूल बांधकामाचे काम सुरू केले जाणार आहे. त्यामुळे शहरातील गरजू व गरीब लोकांना लाभ मिळणार आहे. ‘सर्वांसाठी घर’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री घरकूल योजनेंतर्गत गडचिरोली शहरात गरजूंना घरकुलाचा लाभ मिळणार आहे. गडचिरोली शहरातील नगर पालिका क्षेत्रात २५ वॉर्डांचा समावेश आहे. ५५ हजारांच्या जवळपास येथील लोकसंख्या आहे. आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना हक्काचे घर मिळावे, याकरिता स्थानिक नगर पालिका प्रशासनाने नियोजन केले असून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात फुले वॉर्ड, लांझेडा वॉर्डाची निवड करण्यात आली आहे. लांझेडा वॉर्डात २६१, फुले वॉर्डात २८४ घरकूल निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर घरकूल बांधकाम सुरू केले जाणार आहे. प्रस्तावित घरकूल बांधकामावर २९ कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. शहरात अनेक विकास कामे प्रस्तावित करण्यात आली असून नगर पालिका प्रशासनातर्फे याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात १ हजार ८ घरकूलगडचिरोली नगर पालिका क्षेत्रातील गोकुलनगर व स्वामी विवेकानंद नगरासाठी एकूण १ हजार ८ घरकूल बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. यामध्ये गोकुलनगरात ८०० व विवेकानंद नगरात २०८ घरकूल बांधकामाचे नियोजन होते. १ हजार ८ घरकुलांपैैकी ९ घरकूल दिव्यांगांसाठी प्रस्तावित करण्यात आले होते. या प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी मिळाली असून ७३ कोटी ७५ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. सदर घरकुलांचे बांधकाम केले जाणार आहे, अशी माहिती गडचिरोली नगर पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी दिली आहे.
दुसऱ्या टप्प्यात ५४५ घरकूल
By admin | Published: June 13, 2017 12:47 AM