लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : तालुक्यातील बीएसएनएल थ्रि जी इंटरनेट सेवा मागील काही दिवसांपासून वारंवार विस्कळीत होत आहे. त्यामुळे येथील कार्यालयातील कामकाजावर परिणाम होत आहे. अतिमहत्त्वाची कामे मागे पडत आहेत. त्यामुळे तत्काळ बीएसएनएल इंटरनेट सेवा सुरळीत करावी, अन्यथा कार्यालयाला कुलूप ठोकू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.मुलचेराचे तहसीलदार अनिरूद्ध कांबळे यांना शनिवारी निवेदन सादर करण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुलचेरा तालुक्यातील बीएसएनएल थ्री जी इंटरनेट सेवा सुरळीत नसल्याने सर्व विभागातील व्यवहारावर परिणाम होत आहे. बँकेचे व्यवहार, महसूल कामकाज, शेतकऱ्यांची कृषी योजनेचे व्यवहार, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे व परीक्षेसंबंधीचे अर्ज भरण्यावर परिणाम होत आहे. आरोग्य विभागासह इतर विभागांच्या कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे तत्काळ सेवा सुरळीत करावी, अन्यथा कार्यालयाला कुलूप ठोकू, असा इशारा अशोक बोरकुटे, शनिवारे, वाणी, साना, गाईन, चापले यांनी दिला आहे.
बीएसएनएल इंटरनेट सेवा सुरळीत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:16 AM
लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : तालुक्यातील बीएसएनएल थ्रि जी इंटरनेट सेवा मागील काही दिवसांपासून वारंवार विस्कळीत होत आहे. त्यामुळे येथील कार्यालयातील कामकाजावर परिणाम होत आहे. अतिमहत्त्वाची कामे मागे पडत आहेत. त्यामुळे तत्काळ बीएसएनएल इंटरनेट सेवा सुरळीत करावी, अन्यथा कार्यालयाला कुलूप ठोकू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.मुलचेराचे तहसीलदार अनिरूद्ध कांबळे यांना शनिवारी ...
ठळक मुद्देनिवेदन : कुलूप ठोकण्याचा इशारा