वयाेवृद्ध नागरिक जर एकटेच राहत असतील तर त्यांना वेळेवर पाेलिसांची मदत मिळावी यासाठी पाेलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वृद्धांची नाेंद पाेलीस स्टेशनमध्ये असणे आवश्यक आहे; मात्र गडचिराेली जिल्ह्यातील एकाही पाेलीस स्टेशनमध्ये नाेंद नसल्याने वृद्धांना वेळेवर मदत मिळत नाही. वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन एकटे राहणाऱ्या प्रत्येक वृद्धाची नाेंद करून घेण्याचे निर्देश पाेलीस स्टेशनला देण्याची गरज आहे.
बाॅक्स
काेराेनाकाळात हाल
काेराेनाकाळात प्रत्येक व्यक्ती दुसऱ्यापासून अंतर ठेवून वागत हाेता. या कालावधीत वयाेवृद्ध नागरिक तर दुर्लक्षितच झाले हाेते. घरी औषधी किंवा इतर वस्तूंची गरज पडल्यास ती आणून देण्यास काेणीच तयार नव्हता. अशावेळी पाेलिसांच्या मदतीची गरज या नागरिकांना हाेती.
बाॅक्स
औषधी आणण्याचीही साेय नाही
वयाेवृद्ध नागरिक औषध गाेळ्यांवरच जीवन जगतात;मात्र औषध आणण्यासाठी कुणीच राहत नसल्याने वेळेवर औषध मिळत नाही. स्वयंसेवी संस्थांनी मदतीसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
गडचिराेली पाेलीस ठाण्यात नाेंदच नाही
गडचिराेली शहर हे जिल्ह्यातील सर्वात माेठे शहर आहे. त्यामुळे वृद्ध नागरिकांची संख्याही अधिक आहे. या वृद्धांची नाेंद असणे आवश्यक आहे; मात्र गडचिराेली ठाण्यातही अशी नाेंद नाही.
काेट
आयुष्यात एकदाही पाेलिसांकडून विचारणा नाही
आपण ७० वर्षांचे असून आपल्याला मूलबाळ काहीच नाही. त्यामुळे एकटेच राहावे लागत आहे. एकटे राहत असताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. आजपर्यंतच्या आयुष्यात पाेलिसांनी आपल्याला एकदाही विचारणा केली नाही, अशी आपबिती एका वृद्धाने ‘लाेकमत’समाेर व्यक्त केली.