विजापूर/गडचिराेली : छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ही माहिती छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहे. त्यातच माओवाद्यांचा टीसीओसी कालावधी सुरू आहे. गंगालूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिदिया गावाजवळच्या जंगलामध्ये विजापूर, बस्तर व सुकमा या तीन जिल्ह्यांच्या जवानांनी संयुक्तपणे घेरून माओवाद्यांचा खात्मा केला. माओवादी चळवळीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
सायंकाळी गाेळीबार थांबला. घटनास्थळावरून १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
नक्षलवादी चैतू याला पकडण्यासाठी शोधमोहीमपिडियाच्या जंगलात सुरक्षा दलांनी ज्याला घेरण्यासाठी हालचाली केल्या तो नक्षलवादी चैतू हा दंडकारण्य स्पेशन झोनल कमिटीचा सदस्य आहे. त्याला पकडण्यासाठी ४० लाख रुपयांहून अधिक रकमेचे बक्षीस सरकारने जाहीर केले होेते. बस्तरमध्ये चालणाऱ्या नक्षलवादी कारवायांचा तो सूत्रधार आहे.
या वर्षी आतापर्यंत १०३ नक्षलवाद्यांचा खात्मायंदाच्या वर्षी छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत १०३ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अबूझमाड जंगलात ३० एप्रिल २०२४ रोजी छत्तीसगडमधील सुरक्षा जवान व माओवाद्यांत चकमक झाली होती. यात दहा नक्षल्यांना ठार करण्यात जवानांना यश आले होते. नक्षलवाद्यांचा कमांडर लिंगा, पापाराव, चैतू आदींचा पीडिया परिसरात वावर आहे अशी माहिती मिळाली हाेती. त्यानंतर दंतेवाडा, विजापूर, सुकमा या तीनही जिल्ह्यांतील सुरक्षा दलांच्या जवानांनी संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १२०० जवानांनी मोहीम फत्ते केली. काही नक्षली जखमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकताे.