‘घरचीच खते, घरचीच बियाणे, शेतीला काही पडणार नाही उणे’ या उक्तीप्रमाणे शेतकऱ्यांच्या लागवड खर्चात बचत होण्याच्या उद्देशाने तालुक्यातील कोपरअल्ली, कोळसापूर, अंबेला, लक्ष्मीपूर, लभाण तांडा आदी गावांत धानाच्या सुधारित बियाण्यांची पेरणीपूर्वी ३ टक्के मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करण्याबाबत कृषी सहायक पी. बी. मुंडे यांनी प्रात्यक्षिकासह माहिती दिली. प्रात्यक्षिकादरम्यान धान बियाण्यास ३ टक्के मिठाच्या द्रावणाची, थायरम, कार्बनडाइझम या रासायनिक बुरशी नाशकाची, ॲबेझाेबॅक्टर जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करून पेरणी केल्यास पिकांमध्ये बुरशी व विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी केले. याप्रसंगी मंडळ कृषी आधिकारी सोनल सुतार, कृषी पर्यवेक्षक यू. सी. खंडारे व शेतकरी बांधव उपस्थित होते.
===Photopath===
020621\1717-img-20210602-wa0025.jpg
===Caption===
प्रात्यक्षिक दाखवीत असताना