गडचिराेली तालुक्यातील चुरचुरा येथे आयाेजित बैठकीत ते बाेलत हाेते. तालुक्यात नागरिकांवर वाघांचे हल्ले वाढतच आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाप्रति संताप व्यक्त होत आहे. बहुतांश शेतीलगत जंगल आहे. खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना जंगलातूनच शेतात जावे लागते. धाेका टाळण्यासाठी रस्त्यालगतचे व शेतालगतचे झुडुपे तोडून परिसर मोकळा करावा, असे निर्देश खासदास अशोक नेते यांनी वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक व सहाय्यक उपवनसंरक्षक यांना दिले. तसेच वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी सूचना केली.
चुरचुरा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीला भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री चेतन गोरे, वडसाचे उपवनसंरक्षक, वनपरिक्षेत्राधिकारी मडावी, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी उपस्थित होते.
190821\19gad_3_19082021_30.jpg
मार्गदर्शन करताना खा. अशाेक नेते.