लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आरमोरी मार्गावरील कठाणी नदीपात्रातून रेतीची तस्करी करणाºया ११ बैलबंड्या महसूल विभागाने कारवाई करून मंगळवारी सकाळी जप्त केल्या आहेत. बैलबंडी मालकांवर प्रत्येकी पाच हजार रूपयांचा दंड ठोठावून सोडण्यात आल्या आहेत.कठाणी नदीपात्रातून दरदिवशी शेकडो बैलबंड्यांच्या सहाय्याने रेतीची वाहतूक केली जात होती. सदर रेती गडचिरोली शहरात ३०० ते ४०० रूपये प्रती बैलबंडी दराने विकली जात होती. याबाबतच्या तक्रारी महसूल विभागाच्याकडे प्राप्त झाल्या. महसूल विभागाच्या अधिकाºयांनी मंगळवारी सकाळी वन विभागाच्या नाक्याजवळ पाळत ठेवून ११ बैलबंड्या अडविल्या. या सर्व बैलबंड्यांमध्ये रेती भरली होती. सर्वच बैलबंड्या तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या. तहसीलदारांनी प्रत्येक बैलबंडीला पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला. गडचिरोली येथील हनुमान वॉर्डातील सुधाकर शेंडे, हरिदास काहडे, मारोती काटवे, विलास भांडेकर, एकनाथ भांडेकर, फुले वॉर्डातील गुरूदास मोहुर्ले, सर्वोदय वॉर्डातील उमेश वाणी, गोविंदा लेनगुरे, प्रकाश कोराम, सदाशिव कपाटे, कैलास जुआरे या बैलबंडी मालकांवर कारवाई करण्यात आली. सदर कारवाई तहसीलदारांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी एस.एस. बारसागडे, नरेश वाते, प्रकाश डांगे, निशांत भांडेकर यांनी केली.कठाणी रेती घाटाचा लिलाव अजूनपर्यंत झाला नाही. यावर्षी पाऊस कमी पडल्याने कठाणी नदीला एकदाही पूर आला नाही. नदीपात्र कोरडे असल्याने पावसाळ्यातही रेतीची तस्करी बैलबंडीच्या मार्फत केली जात होती. पहाटेपासून सुरू झालेली वाहतूक दिवसा उशिरापर्यंत सुरू राहते. रेती तस्करीमुळे शासनाचे लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. जिल्ह्याच्या इतरही भागात ट्रॅक्टर व इतर चारचाकी मालवाहू वाहनांच्या सहाय्याने रेतीची तस्करी केली जात आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
रेती तस्करी करणाºया ११ बैलबंड्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:44 AM
आरमोरी मार्गावरील कठाणी नदीपात्रातून रेतीची तस्करी करणाºया ११ बैलबंड्या महसूल विभागाने कारवाई करून मंगळवारी सकाळी जप्त केल्या आहेत.
ठळक मुद्देप्रत्येकी पाच हजार रूपयांचा दंड : कठाणी नदीतून केली जात होती रेतीची वाहतूक