अडपल्ली येथील रेती घाट क्रमांक-२ मधून रेतीची चाेरी केली जात असल्याची गाेपनीय माहिती महसूल विभागाला प्राप्त झाली. त्यानुसार महसूल विभाग व पाेलिसांच्या पथकाने रेती घाट गाठला असता नदी घाटात दाेन ट्रॅक्टर आढळून आले. एमएच ३३ व्ही ४८०२ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये रेती भरली हाेती. हे वाहन राजू बाबाजी उंदीरवाडे यांच्या मालकीचे असून वाहन अजय माराेती मुनघाटे रा. गाेगाव हा चालवत हाेता. एमएच ३३ व्ही ७८१२, ट्राॅली क्रमांक एमएच ३३ व्ही ०५८९ हा ट्रॅक्टर रेती घाटात रिकामा आढळून आला. हे वाहन विजय गुंजनवार, रा. गडचिराेली यांच्या मालकीचे आहे. वाहनांसाेबत दाेन वाहनचालक, आठ मजूर आढळून आले. ट्रॅक्टर पाेलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या रेती घाटाचा लिलाव करण्यात आला असून हा घाट देऊळगाव येथील आशिष माणिकराव येंचीलवार यांना भाड्याने देण्यात आला आहे. ही कारवाई गडचिराेलीचे उपविभागीय अधिकारी अशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार एच. आर. माेहरे यांचे पथक व पाेलिसांनी संयुक्तरीत्या केली.
रेती चाेरणारे दाेन ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:27 AM