अमाेल इंदुरकरआरमाेरी : येथील प्रा. अमाेल सी. इंदुरकर यांना गाेंडवाना विद्यापीठाने आचार्य पदवी बहाल केली. इंदुरकर यांनी इंग्रजी विषयात ‘क्रिटिकल स्टडी ऑफ साेसिअल प्राॅब्लेम्स ॲझ रिफ्लेक्टेड इन दी नाेवेल्स ऑफ अरविंद अडिगा’ या विषयावर संशाेधन केले. याकरिता त्यांना देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयातील डाॅ. श्रीराम गहाणे यांचे मार्गदर्शन लाभले. इंदुरकर हे चंद्रपूर जिल्ह्याच्या तळाेधी (बालापूर) येथील श्री. गाेविंदप्रभू कला व वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
फाेटाे
माणिकचंद रामटेके
आष्टी : येथील कवी माणिकचंद रामचंद्र रामटेके यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नागपूर विभागीय अध्यक्ष कवी सतीश सोमकुवर व विभागीय सरचिटणीस जयेंद्र चव्हाण यांनी त्यांची नियुक्ती केली.
फाेटाे
जुगल बोम्मनवार
अहेरी : येथील जुगल सत्यनारायण बोम्मनवार यांची माहिती अधिकार कार्यकर्ता समितीच्या राज्य युवक शाखा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेश अध्यक्ष साईनाथ शिंदे यांनी बाेम्मनवार यांची नियुक्ती केली.