अतुल बुराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी देसाईगंज तालुक्यातील कुकडी येथे नि:शुल्क दमा औषधीचे वितरण केले जाते. अनेकांना याचा लाभ घडत असल्याने दरवर्षी औषधी घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. याही वर्षी मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी ८ जून रोजी औषधीचे वितरण केले जाणार आहे. यानिमित्त वैदू प्रल्हाद कावळे यांच्याशी थेट संवाद साधून लोकमतने त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, स्वार्थ न बाळगता केलेल्या जनसेवेमुळे खरे समाधान मिळते, असे मत कावळे यांनी व्यक्त केले.दमा रोगावर औषध देण्याची प्रेरणा कुठून मिळाली?- मला स्वत:ला दमा होता. दमा रोग बरा होण्यासाठी मी धडपड होतो. त्यातूनच दमावरची औषधी शोधून काढली. स्वत:वरच तीन वर्ष सतत प्रयोग केला. त्यातून मी बरा झालो. त्यानंतर गावातील दुसºया व्यक्तीवर प्रयोग केला. तो सुध्दा बरा झाला. त्यातून औषधाविषयची खात्री पटली. त्यानंतर मित्रमंडळी, गावकरी, नातलग यांना दमा औषधीचा लाभ झाला. त्यामुळे दमा औषधी घेणाऱ्यांची संख्या वाढत गेली व आज ती लाखोंच्या घरात पोहोचली आहे.औषधीसाठी कुठून कुठून रूग्ण येतात?- जेव्हा मी दमा औषध देणे सुरू केले. त्यावेळी माझ्या गावातील व आजुबाजुच्या गावचे रूग्ण येऊ लागले. त्यानंतर प्रचार होऊन महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यातील दमा रूग्ण कोकडी येथे येतात.रूग्णसेवेकडे आपण कोणत्या दृष्टीने बघता?- मी पाचवा वर्ग शिकलो आहे. दुसºयांचे चांगले करावे, असे संस्कार माझ्या आई-वडिलांनी केले आहेत. दमा रूग्णांना होणारा त्रास मी स्वत: अनुभवला आहे. समाजातील ज्या रूग्णांना दमा रोग झाला आहे, त्यांना दमा रोगातून कायमचा मुक्त करणे या विचाराने आजही मी दमा औषधीचे वितरण करतो.आपल्या सेवाकार्याला गावकऱ्यांचे योगदान लाभते काय?- रूग्णांची संख्या वाढली आहे. हजारो रूग्णांना केवळ माझ्या घरी औषध देणे शक्य होत नाही. आता रूग्णांची संख्या हजारोंच्या घरात राहत असल्याने बिसन सहारे यांच्या मालकीच्या वाड्यात औषधी दिली जाते. औषधीसाठी लागणाऱ्या मासोळ्या ढिवर-भोई समाज गोळा करतात. रूग्णांच्या राहणे व जेवनाची व्यवस्था गावकरी करतात. त्यामुळे माझ्या या कार्यात गावकऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. पोलीस विभाग संरक्षण उपलब्ध करून देते.
नि:स्वार्थ जनसेवेने खरे समाधान मिळते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 11:55 PM
मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी देसाईगंज तालुक्यातील कुकडी येथे नि:शुल्क दमा औषधीचे वितरण केले जाते. अनेकांना याचा लाभ घडत असल्याने दरवर्षी औषधी घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.
ठळक मुद्देप्रल्हाद कावळे यांच्याशी थेट संवाद