आष्टी या गावाची लोकसंख्या जवळपास १५ हजार आहे. येथील विद्युत फिडरवरून मार्कंडा, रामकृष्णपूर, कढोली, चौडमपल्ली आदी जंगलव्याप्त गावाला विद्युत पुरवठा होतो. वादळ, वारा, पाऊस व अवैध शिकार यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कनेक्टिव्हिटीमुळे बँकांची कामे होत नाही. शिवाय ऑनलाईन कामेसुद्धा ठप्प पडतात. त्यामुळे नागरिक चांगलेच त्रासले आहेत. या भागात कृषी पंपाची मागणी वाढत आहे त्यामुळे विद्युत फिडरवर जास्त दाब आल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे आष्टी येथे स्वतंत्र विद्युत फिडरची नितांत गरज आहे, असे पंदीलवार यांनी ना. वडेट्टीवार यांना पटवून दिले.
आष्टी येथे स्वतंत्र विद्युत फिडर देण्यात यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:24 AM