मकरसंक्रांतीसाठी प्रत्येक महिला तीळ-गुळ तयार करते. त्यामुळे तीळ-गुळाची मागणी अचानक वाढते. पुढील आठ दिवसानंतर वाण, तीळ, गुळाची मागणी वाढण्याचा अंदाज लक्षात घेऊन दुकानदारांनी तीळ व गुळाचा साठा करून ठेवण्यास सुरूवात केली आहे. दुकानात इतर साहित्य खरेेदीसाठी येणाऱ्या महिलांना आपल्या दुकानात उच्च प्रतीचे गुळ व तीळ असल्याचे सांगत आहेत. तीळ व गुळाचे भाव जरी स्थिर असले तरी वाणाचे भाव मात्र वाढले आहेत.
बाॅक्स..
तीळ १६० रू. किलाे
ग्रामीण भागात पायलीने तीळ खरेदी केले जाते. तर शहरात किलाेच्या दराने तीळ खरेदी केला जाते. यावर्षी तीळाचा भाव १६० ते १८० रुपये किलाेदरम्यान आहे. हा भाव जवळपास मागील वर्षी एवढाच असल्याची माहिती दुकानदारांनी दिली.
गुळ ६० रु. किलाे
तीळ-गुळ बनविण्यासाठी गुळ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. काही महिला गुळापासून मुरमुरा, शेंगदाणा व तीळाचे लाडू सुद्धा बनवितात. त्यामुळे गुळाची मागणी अचानक वाढते.
साखर ३८ रु. किलाे
ठाेकदराने धेतल्यास साखर ३६ रुपये किलाे व चिल्लर खरेदी केल्यास ३८ रुपये किलाे दराने साखरेची विक्री केली जात आहे. तीळ-गुळामध्ये काही प्रमाणात साखर टाकून तीळगुळाची चव वाढविली जाते. त्यामुळे साखरेचीही मागणी वाढते.
काेट...
मकरसंक्रांत हा महिलांचा अतिशय महत्त्वाचा सण आहे. मात्र यावर्षी काेराेनाचे संकट आहे. वाणासाठी फिरताना महिलांनी काेराेनाबाबतची काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा काेराेनाचे संकट पुन्हा ओढवू शकते.
- कल्याणी कडस्कर, गृहिणी
तीळ, गुळ व साखरेचे दर मागील वर्षी एवढेच आहेत. तीळ संक्रांत जवळ आल्यानंतर दुकानदारांमध्ये माल विक्रीची स्पर्धा सुरू हाेते. त्यामुळे या वस्तूंचे भाव आणखी काही प्रमाणात कमी हाेण्याची शक्यता आहे.
- विनाेद बानबले, व्यापारी