लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : सोमवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एक ज्वेलर्स व सहा घरे फोडून चोरी केली. त्याचबरोबर एक दुचाकीसुद्धा चोरून नेली. एकाच रात्री एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्याने धानोरा येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.धानोरा येथे मुख्य मार्गावर पप्पु ज्वेलर्स यांचे दुकान, प्रियदर्शनी विद्यालयाच्या प्राचार्य जयश्री लोखंडे, त्यांचे भाडेकरू तोंडरे यांचे घर फोडले. त्याचबरोबर सामानाची नासधूस केली. टी. डी. कोरेटी व मेंढे यांच्या घराच्या कुलुपाचे हूक तोडले. जुन्या मुलींच्या वसतिगृहाजवळील भरडकर यांच्या घरचे किरायेदार राहूल माहुरकर यांची एमएच ३३ एन. २१७२ क्रमांकाची दुचाकी चोरून नेली. मात्र यातील एकाही नागरिकाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चोरट्यांनी सुरूवातीला घरे फोडली. मात्र त्यांच्या हातात सोने किंवा मोठी रोकड हातात लागली नाही. परिणाम ते निराश झाले. काही घरातील वस्तूही फेकून दिल्या. चोरांच्या हातात काहीच न लागल्याने बाहेर ठेवलेली दुचाकी चोरून नेली आहे.एकाच रात्री सात घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीच्या सुमारास शहरात पोलीस बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
धानोऱ्यात एकाच रात्री सात घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:53 AM
सोमवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एक ज्वेलर्स व सहा घरे फोडून चोरी केली. त्याचबरोबर एक दुचाकीसुद्धा चोरून नेली. एकाच रात्री एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्याने धानोरा येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देदुचाकीची चोरी : नागरिकांमध्ये दहशत; गस्त वाढविण्याची मागणी