शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
2
नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी
3
आजचे राशीभविष्य : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, सामाजिक मान-सन्मान मिळाल्याने प्रसन्न वाटेल
4
T20 World Cup: न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या! दक्षिण आफ्रिकेवर ३२ धावांनी विजय
5
ही शाळा की कोचिंग क्लास? शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे, याचे भान व्यवस्थांना कधी येईल?
6
Mutual Fund Investment : ३००० रुपयांच्या SIP नं बनले ५ कोटी रुपये; 'या' म्युच्युअल फंडानं गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
7
'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! ही मालिका घेणार निरोप?
8
मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी मतदारांसाठी घेतला निर्णय
9
विशेष लेख: कॅनडा, भारत अन् पाकिस्तान... देशादेशातल्या गाठी, निरगाठी... आणि उकल!
10
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
11
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
12
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
13
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
14
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
15
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
16
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
17
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
18
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
19
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
20
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा

दक्षिण अबूझमाडमध्ये सात नक्षल्यांचा खात्मा; घटनास्थळी आला आढळून मोठा शस्त्रसाठा

By संजय तिपाले | Published: October 04, 2024 5:23 PM

जोरदार धुमश्चक्री : घटनास्थळी आढळला मोठा शस्त्रसाठा

गडचिरोली : छत्तीसगडच्या दंतेवाडा- नारायणपूर सीमावर्ती भागातील दक्षिण अबूझमाडमध्ये जवान व नक्षल्यांत ४ ऑक्टोबरला जोरदार धुमश्चक्री उडाली. यात सात नक्षल्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. घटनास्थळी मोठा शस्त्रसाठा आढळून आला आहे.

गडचिरोलीपासून अडीचशे किलोमीटरवर हे घटनास्थळ आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा व नारायणपूर  या दोन जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील दक्षिण अबूझमाडमध्ये काही नक्षली दबा धरुन बसल्याची माहिती छत्तीगडच्या सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार दोन्ही जिल्ह्यांच्या सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तपणे नक्षल्यांविरोधात अभियान राबविले. यावेळी अचानक जवानांच्या दिशेने नक्षल्यांनी गोळीबार केला. जवानांनी नक्षल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. चकमकीनंतर परिसरात झडती घेतली असता सात नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. तेथे एके-४७, एसएलआरसह इतर नक्षल शस्त्र व साहित्य आढळून आले. ते जवानांनी ताब्यात घेतले आहे.त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. सर्व जवान सुरक्षित आहेत. 

गडचिरोली कनेक्शनची चौकशी सुरुदरम्यान, अबूझमाड हा नक्षल्यांचा बालेकिल्ला असून गडचिरोलीत तेथूनच मोठ्या प्रमाणात घातपाती कारवायांचा कट रचला जातो. या पार्श्वभूमीवर शेजारच्या छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ठार झालेल्या सात नक्षल्यांचे गडचिरोली 'कनेक्शन' आहे का, याची सध्या चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

"या चकमकीबाबत माहिती मिळाली आहे, पण अद्याप संबंधित नक्षल्यांचा गडचिरोलीशी संबंध असल्याची माहिती समोर आलेली नाही. त्यांचे रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरु आहे."- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली

बालेकिल्ल्यातच हादराअबूझमाडच्या जंगलात माओवाद्यांची नेहमीच हुकूमत राहिलेली आहे. मात्र, दक्षिण अबूझमाडमध्ये छत्तीसगडच्या जवानांनी सात नक्षल्यांनला कंठस्नान घालून माओवाद्यांना मोठा हादरा दिला आहे. या घटनेनंतर गडचिरोली जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी