ऑनलाईन लोकमतगडचिरोली : लिलाव न झालेल्या ठिकाणच्या रेतीची अवैधपणे वाहतूक करणारे पाच ट्रॅक्टर गुरूवार व शुक्रवारी जप्त करण्यात आले. त्यांच्यावर नवीन अधिसूचनेनुसार प्रत्येकी १ लाख १२ हजार ९०० रूपये याप्रमाणे सुमारे ६ लाख ७७ हजार ४०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.गडचिरोली तालुक्यातील रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांना मिळाली. त्यानुसार धानोरा मार्गावरील इंदिरा नगर वॉर्डाजवळ पाळत ठेवली असता गुरूवारच्या सायंकाळी ७ वाजता रेतीची वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडून जप्त केले. त्यानंतर शुक्रवारी गडचिरोली शहरातील मूल मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ एक ट्रॅक्टर जप्त केले. नवीन अधिसूचनेनूसार प्रत्येक ट्रॅक्टरवर सुमारे १ लाख १२ हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. सहा ट्रॅक्टरवर एकूण ६ लाख ७७ हजार ४०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.कारवाई झालेल्या ट्रॅक्टरमध्ये रजनीश कोल्हे रा.इंदिरानगर यांच्या मालकीचे एमएच ३३, टी ०४०५ व एमएच ३३, टी ०४०६ क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर, जितेंद्र रमशे भांडेकर यांचा एमएच ३३ एफ ४९४५ व सुशील कोठारे यांच्या मालकीचा एमएच ३३, एफ ३९१९ क्रमांकाचा ट्रॅक्टर व विशाल देशमुख यांच्या मालकीचा एमएच ३२ पी ३१६९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे.टीपी नसल्यास रेती मालकावरही होणार कारवाईजेवढी ब्रॉस रेती खरेदी केली जाते. त्या प्रत्येक ब्रॉसचा स्वतंत्र इनव्हॉईस नंबर असलेली टीपी संबंधित रेती मालकाकडे असणे आवश्यक आहे. रेती मालकाकडे आॅनलाईन इनव्हॉईस नंबर असलेली टीपी नसल्यास संबंधित रेती मालकाला जबाबदार धरून त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे ट्रॅक्टर मालकाकडून प्रत्येक ब्रॉसची स्वतंत्र टीपी मागावी, असे सहायक जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केले आहे.
रेतीची अवैध वाहतूक करणारे पाच ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:48 AM
लिलाव न झालेल्या ठिकाणच्या रेतीची अवैधपणे वाहतूक करणारे पाच ट्रॅक्टर गुरूवार व शुक्रवारी जप्त करण्यात आले. त्यांच्यावर नवीन अधिसूचनेनुसार प्रत्येकी १ लाख १२ हजार ९०० रूपये याप्रमाणे सुमारे ६ लाख ७७ हजार ४०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.
ठळक मुद्दे६ लाख ७७ हजारांचा दंड : नवीन अधिसूचनेनुसार कारवाई