गुंडापल्ली येथील नेपाल हजारी मिस्त्री हा जंगल परिसारत गूळ व माेहाची दारू काढत असल्याची गाेपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने पंचांसह घटनास्थळ गाठले. पाेलीस आल्याची चुणूक लागताच नेपाल व त्याचे इतर दाेन साथीदार जंगलात पळून गेले. तिघांपैकी पंचानी नेपाल मिस्त्रीची ओळख पटविली. इतर दाेघांना मात्र ओळखू शकले नाही. घटनास्थळावरून ३ लाख २० हजार रुपये किमतीचा माेहफूल सडवा आढळून आला. तसेच दारू काढण्यासाठी वापरण्यात येणारे १४ हजार रुपये किमतीचे साहित्यही आढळले. हे सर्व साहित्य व सडवा जप्त करून नष्ट करण्यात आले आहे. तिघाजणांविराेधात आष्टी पाेलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पाेलीस हवालदार निलकंठ पेंदाम, नाईक पाेलीस शिपाई शुक्रचारी गवई, पाेलीस शिपाई मंगेश राऊत, पुष्पा कन्नाके, शेषराज राऊत यांच्या पथकाने केली. तिघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सव्वातीन लाखांचा माेहफूल सडवा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:36 AM