सामाजिक न्याय दिनानिमित्त प्रा. गहाणे यांनी शाहू महाराजांनी दुर्लक्षित घटकाबद्दल केलेल्या कार्याचे तसेच अस्पृश्यता कमी करण्यासाठी केलेले कार्य, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याचे यावेळी उजाळा दिला. शाहू महाराजांनी दुर्लक्षित घटकांना नोकऱ्या दिल्या. सार्वजनिक ठिकणी अन्नछत्रे, धर्मशाळा, रेस्टहाऊस, सार्वजनिक विहिरी, शाळा, दवाखाने, तलाव या ठिकाणी अस्पृश्यता पाळायची नाही असा कायदा अमलात आणला, असे विविध सामाजिक क्रांतिकारक निर्णय घेत सामाजिक क्षेत्रात राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे यावेळी गहाणे यांनी सांगितले.
बाॅक्स....
समाजकल्याणच्या कर्मचाऱ्यांना योजनांच्या पुस्तिकेचे वाटप
सामाजिक न्याय विभाग येथे शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त व सामाजिक न्याय दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजेश पांडे, उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाकडून तयार करण्यात आलेल्या ‘समाज कल्याण-योजनांची माहिती’ पुस्तिकेचे वाटप समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते. यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती देण्यात आले. या कार्यक्रमाला राजेश पांडे, उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, बी.एम. मेश्राम व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.