लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पोलीस संकुलात असलेल्या सीआरपीएफ १९२ बटालियनतर्फे ९ एप्रिल रोजी ५४ वा शौर्यदिवस साजरा करण्यात आला.सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक मानस रंजन हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांना गार्ड आॅफ आॅनरने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी व जवानांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मार्गदर्शन करताना मानस रंजन यांनी ९ एप्रिल १९६५ रोजी सीआरपीएफच्या जवानांनी दाखविलेल्या साहसाची माहिती दिली. उपस्थित सर्व जवानांना ‘आम्ही देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या बहादुरीचा परिचय देत राहू’ अशी शपथ देण्यात आली. विशेष शौर्याबद्दल सीआरपीएफ जवान प्रवीण पाटील यांना २६ जानेवारी २०१९ रोजी गणतंत्र दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रपतींद्वारे सन्मानित करण्यात आले. शौर्यदिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रवीण पाटील यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला १९२ बटालियनचे कमांडंट जिआऊ सिंह, द्वितीय कमान अधिकारी दीपककुमार साहू, कुलदीपसिंह खुराणा, उपकमांडंट कैैलास गंगावणे, संध्या राणी, सपन सुमन, वेदपाल सिंह यांच्यासह केंद्रीय राखीव पोलीस दलाचे इतर अधिकारी उपस्थित होते.शौर्यदिनाचा इतिहास९ एप्रिल १९६५ रोजी सीआरपीएफच्या चार कंपन्यांनी गुजरात राज्यातील कच्छ परिसरात पाकिस्तानच्या एका इंफेट्री ब्रिगेडवर हमला करून सदर इंफेट्री पूर्णपणे नष्ट केली. ही घटना युद्धकौशल्याचे अद्वितीय प्रतीक मानले जाते. तेव्हापासून शौर्यदिन साजरा होतो.
१९२ बटालियनतर्फे शौेर्य दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:24 AM
पोलीस संकुलात असलेल्या सीआरपीएफ १९२ बटालियनतर्फे ९ एप्रिल रोजी ५४ वा शौर्यदिवस साजरा करण्यात आला. सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक मानस रंजन हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
ठळक मुद्देशहीद जवानांना श्रद्धांजली : १९६५ मध्ये नष्ट केली होती पाकिस्तानची इन्फंट्री ब्रिगेड